मुंबई : जगभरात मंकीपॉक्सने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 92 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारतातही अलर्ट देण्यात आला आहे. हा आजार चिकनपॉक्स सारखाच असल्याचं अनेकांना वाटतं पण यामध्ये फरक आहे. चिकन पॉक्स आणि मंकीपॉक्स यामध्ये फरक आहे.
भारतात अजून एकही मंकीपॉक्सचा रुग्ण समोर आला नाही. मात्र भारत आणि मुंबईतही अलर्ट देण्यात आला आहे. मंकीपॉक्स आणि चिकनपॉक्समध्ये नेमका काय फरक आहे तो कसा ओळखायचा जाणून घेऊया.
मंकीपॉक्समुळे 10 टक्के मृत्यू होण्याची शक्यता आहे. मंकीपॉक्समध्ये ताप येतो. हा ताप लवकर उतरत नाही. डोकेदुखी, मसल पेन आणि अंगावर फोड आले असतील तर डॉक्टरला तातडीने दाखवा. 5 ते 15 दिवसांपर्यंत हा आजार राहातो.
मंकीपॉक्समध्ये स्कीन रॅश देखील येतात. हाता-पायाला फोड येतात आणि त्वचा लालसर होते. या कालावधीमध्ये खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. स्वच्छता आणि निगा राखायला हवी.
चिकन पॉक्स 3 ते 4 दिवस राहातो आणि त्यातून पूर्ण बरं होण्यासाठी दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. चिकन पॉक्समध्येही अंगावर बारीक लाल पुरळं येतात. काहीवेळा थंडी वाजून तापही येऊ शकतो. त्वचेवर रॅश येतात. हा आजार शरीरात आतून इम्युनिटी सिस्टिमला खराब करतो.
Herpes vericella- zoster virus नावाच्या विषाणूमुळे हा आजार होतो. हा आजार खोकला आणि शिंकामधून पसरतो. 15 वर्षांखालील मुलांना हा आजार जास्त होण्याचा धोका असतो. दोन्ही पैकी कोणतीही लक्षणं असतील तर तातडीनं रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.