Diabetes रुग्णांनी 'या' झाडांची पानं खाल्ली तर डॉक्टरकडे जायची गरजच पडणार नाही; नियंत्रीत होईल Blood Sugar Level

Diabetes Control करायचा असेल तर खाली दिलेल्या या झाडांच्या पानांचे करा सेवन नक्कीच रक्तातील ग्लुकोज येईल नियंत्रणात... जाणून घ्या टिप्स

Updated: Jan 14, 2023, 04:24 PM IST
Diabetes रुग्णांनी 'या' झाडांची पानं खाल्ली तर डॉक्टरकडे जायची गरजच पडणार नाही;  नियंत्रीत होईल Blood Sugar Level title=

Diabetes Control Tips: मधुमेह म्हणजे डायबिटीस (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे जो कोणत्याही व्यक्तीच्या रोजच्या जीवणावर परिणाम करू शकतो. कारण त्या व्यक्तीला जेवताना देखील सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. (Diabetes Control) त्यामुळे आधीच काही गोष्टींचे पालन केले तर कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. मधुमेहाच्या रुग्णांना नेहमी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे लागते. जर रक्तातील ग्लुकोजचे पातळी वाढली तर ते आरोग्यासाठी घातक ठरते. जर तुम्हालाही या समस्येपासून वाचून रहायचे असेल तर आज आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यानं मधुमेह नियंत्रणात येईल. 

रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करायची असेल तर खा या झाडाची पानं

दिल्लीच्या ग्रेटर नोएडा येथील GIMS हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या प्रसिद्ध आहारतज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, मधुमेह झालेल्या रुग्णांनी 3 प्रकारच्या झाडांच्या हिरव्या पानांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची पातळी कमी होण्यास मदत होते.

बडीशेपची पाने (Dill leaves)

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी बडीशेपची पाने वरदानापेक्षा कमी नाही. या पानांचे नियमित सेवन केले पाहिजे, तरच तुम्ही रक्तातील ग्लुकोजची पातळी सहज कमी होईल. हे रोप तुम्ही घरच्या कुंडीतही वाढवू शकता.

हेही वाचा : लग्नानंतर Akshaya Deodhar ची पहिली मकर संक्रांत, अभिनेत्रीचा Festive लूक व्हायरल

कोरफड (Aloe Vera)

कोरफडीचं जेल तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक वेळा वापरले असेल, पण तुम्हाला माहित आहे का की याचे सेवन केल्यानं रक्तातील ग्लुकोज पातळी कमी होऊ शकते. जर तुम्ही त्याचा जेलचा रस नियमितपणे प्यायला तर त्याचे फायदे शरीरात दिसून येतील.

इन्सुलिन प्लांट (Insulin Plant)

आहारतज्ञ आयुषी यांच्या मते, जर तुम्ही इन्सुलिन प्लांट या झाडाची पानं साधारण महिनाभर रोज चघळली तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. कसे कराल या झाडाच्या पानाचे सेवन? या झाडाचं पान एक दिवस उन्हात वाळवा आणि नंतर त्याची पावडर बनवून त्याला एका डब्ब्यात स्टोअर करा. या झाडात प्रोटीन, एंटीऑक्सीडेंट, एस्कॉर्बिक एसिड, बीटा कॅरेटीन, कोरोसोलिक, टेरपेनॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक घटक आढळतात. या पोषक घटकांमुळे मधुमेगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. 

( Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही. )