Dark Upper Lips: ओठांवरील काळे डाग नको असल्यास करा 'हे' घरगुती उपाय

 काही घरगुती उपायांनी हे काळे डाग दूर केले जाऊ शकतात. 

Updated: Oct 9, 2022, 01:25 PM IST
Dark Upper Lips: ओठांवरील काळे डाग नको असल्यास करा 'हे' घरगुती उपाय title=
Dark Upper Lips If you dont want dark spots on your lips try these home remedies nz

Black Upper Lip Home Remedies: ओठ (Lips) काळे होण्याबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल आणि यासाठी बाजारात अनेक ब्यूटी प्रोडक्टस (Beauty Products) देखील आहेत, परंतु तुमच्या हे लक्षात आले आहे का? काही लोकांच्या ओठांवर म्हणजे नाकाच्या अगदी खाली काळे डाग पडतात? होय, त्याचे कारण हे देखील असू शकते जेव्हा तुम्ही ती जागा नीट साफ करत नाही. 

आणखी वाचा - Breakup नंतर Move on होण्यासाठी 'या' 5 टिप्सचा करा वापर

या पिग्मेंटेशनची (Pigmentation) इतर कारणे देखील असू शकतात. उदाहरणार्थ, काही स्त्रिया ओठांवरचे नको असलेले केस काढण्यासाठी ब्लीचचा (Bleach) वापर करतात. जर ते प्रोडक्टस तुमच्या चेहऱ्यास सूट नाही झाले तर अशा परिस्थितीत काळे डाग येतात. मात्र, अजिबात घाबरण्याची गरज नाही. काही घरगुती उपायांनी हे काळे डाग दूर केले जाऊ शकतात. (Dark Upper Lips If you dont want dark spots on your lips try these home remedies nz)

ओठांवरील काळे डाग दूर करण्याचे उपाय

1. हळद (Turmeric)
हळद ही जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात आढळते. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, त्याची उपचार शक्ती त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दुधात किंवा दह्यात हळद मिसळल्यानंतर जिथे काळा डाग आहे त्या त्वचेवर लावा आणि नंतर धुवा.

2. दूध (Milk)
दूधात अल्फा हायड्रॉक्सी असते जे ओठावरील काळे डाग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. आपण त्या त्वचेवर थेट दूध लावू शकता. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर ओटमील पावडर किंवा गुलाब पाणी आणि चंदन पावडर मिक्स करा.

3. दही (curd)
दह्याचा वापर त्वचेच्या काळजीसाठी केला जातो, त्यात दुधासारखे अल्फा हायड्रॉक्सी असते जे पिगमेंटेशन काढून टाकण्यास मदत करते. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी, दही आणि गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि नंतर जिथे काळे डाग आहेत त्या जागी लावा आणि काही वेळ राहू द्या. शेवटी स्वच्छ पाण्याने धुवा.

आणखी वाचा - कमी वयातच मुलं प्रेमात? पालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

4. मध (Honey)

मध हा त्वचेचा मित्र मानला जातो, याद्वारे काळे डाग दूर करता येतात. , सर्व प्रथम, एका लहान भांड्यात अर्धा चमचा मध आणि एक चमचे गुलाबजल मिसळा. ही पेस्ट काळ्या डागांवर लावा आणि सुमारे 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि शेवटी स्वच्छ पाण्याने धुवा.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)