फिश फूट स्पा करत असाल तर वाढू शकतो 'या' गंभीर आजारांंचा धोका

आजकाल जीवनशैली तणावग्रस्त झाल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय आजामावले जातात. ब्युटीपार्लरमध्येही अनेक महागड्या मसाज पॅकेजची आमिष दाखवली जातात. परंतू पुरेशी काळजी आणि स्वच्छतेची काळजी न घेतल्यास हेच उपचाअर बूमरॅंगसाराखे पलटूदेखील शकतात.  

Updated: Mar 27, 2018, 09:19 PM IST
फिश फूट स्पा करत असाल तर वाढू शकतो 'या' गंभीर आजारांंचा धोका title=

मुंबई : आजकाल जीवनशैली तणावग्रस्त झाल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय आजामावले जातात. ब्युटीपार्लरमध्येही अनेक महागड्या मसाज पॅकेजची आमिष दाखवली जातात. परंतू पुरेशी काळजी आणि स्वच्छतेची काळजी न घेतल्यास हेच उपचाअर बूमरॅंगसाराखे पलटूदेखील शकतात.  

फिश फूट स्पा ठरू शकतो धोकादायक  

ब्युटी पार्लरमध्ये अनेक प्रकारचे स्पा उपलब्ध आहेत. अशांपैकी एक म्हणजे फिश फूट स्पा. मात्र हेल्थ एक्स्पर्ट्च्या माहितीनुसार, फिश फूट स्पामुळे एचआयव्ही आणि हेपेटायसिस सी सारख्या आजारांचा धोका बळावू शकतो. 

गव्हर्नमेंट हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मधूमेह, रोगप्रतिकारक्षमता कमजोर असलेल्यांनी फिश स्पा करण्यापासून दूर रहावे.  

नव्या गाईडलाईननुसार, फिश स्पा ही ट्रिटमेंट लोकप्रिय असल्याने अनेकांना इंफेक्शनचा धोका होऊ शकतो. या स्पा ट्रिटमेंटमध्ये लहान लहान माशांचा वापर स्पासाठी केला जातो. हे मासे डेड स्किनवर हल्ला करतात.  
 
 का वाढतो धोका?

 एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, फिश टॅंकमधील पाणी वेळोवेळी न बदलल्यास एका कस्टरमकडून दुसर्‍या कस्टमरकडे इंफेक्शन पसरू शकते. जर एखादा कस्टमर एचआयव्ही आणि हेपेटायटिस बाधित असतील तर हे इंफेक्शन पसरू शकते.  

 गाईडलाईन  

दिवसेंदिवस स्पा सेंटर्स वाढत असल्याने त्याच्यासाठी असलेल्या गाईडलाईन्सदेखील वाढत आहेत. इंफेक्शनचा धोका हमखास नसला तरीही त्यादरम्यान काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणूनच स्वच्छतेशी संबंधित नियामांची काळजी घेणं आवश्यक आहे. 

  अमेरिकेत बॅन  

 आशियामध्ये फिश फूट स्पा हा प्रकार लोकप्रिय आहे. मात्र अमेरिकेतील काही राज्यांमध्ये त्यावर बॅन आहे. जखमा पुरेशा भरलेल्या नसतील तर त्यामुळे इंफेक्शनचा धोका वाढू शकतो.