कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं सर्वाधिक प्रभावी असतील, तर गर्भवतींसाठी लस का आहे महत्त्वाची?

 देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच जोर ओसरला आहे. मात्र कोरोनाचा धोका हा अजूनही कायम आहे.

Updated: Jun 5, 2021, 05:48 PM IST
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं सर्वाधिक प्रभावी असतील, तर गर्भवतींसाठी लस का आहे महत्त्वाची? title=

मुंबई : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच (Corona) जोर ओसरला आहे. मात्र कोरोनाचा धोका हा अजूनही कायम आहे. कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. तसेच दररोज कोरोनामुळे अनेकांना आपल्या जीवला मुकावे लागत आहेत. दररोज समोर येणारा मृतांचा आकडा हा धडकी भरवणारा आहे. देशात दररोज कोरोनाच्या 1 लाखापेक्षा अधिक रुग्णांचे निदान होत आहे. तसेच 3 हजारांपेक्षा अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे. (Danger to newborns in the third wave of corona virus What experts say)

कोरोनाच्या या नको असलेल्या पॉझिटिव्ह वातावरणाचा सर्वाधिक धोका हा गर्भवतींना आहे. त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरही याचा धोका असतो. या कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच एक प्रभावी आणि जालिम उपाय आहे. मात्र गर्भवतींना लस द्यायची की नाही, याबाबत अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. पण गर्भवतींसाठी लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा खुलासा जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि केंद्र सरकारने केला आहे.  

गर्भवतींसाठी कोरोना लसीकरण किती महत्तवाचं?

गर्भवती असताना कोरोना लस घ्यायची की नाही, या लसीमुळे त्रास होतो का, याबाबत सामांन्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या भितीपोटी अनेकांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. मात्र सामन्यांच्या मनातील या सर्वसामान्य पण तितक्याच महत्वाच्या प्रश्नाचं निरसण स्त्री रोगतज्ज्ञ शारदा जैन यांनी केलं आहे. 

शारदा जैन काय म्हणाल्या? 

"गर्भधारणे दरम्यान गर्भवतींनी कोरोना लस घेणं आवश्यक आहे. कोरोना काळात लस घेणं हे अत्यंत प्रभावशील आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. मात्र लस घेतल्याने हा सर्व धोका संभवत नाहीत", असं जैन यांनी स्पष्ट केलं. दरम्यान  FOGS यांनीही गर्भवतींसाठी कोरोना लस महत्वाचं असल्याचं सांगितलं आहे.  

तिसऱ्या लाटेत नवजातांना कोरोनाचा धोका? 

तज्ज्ञांनुसार भारतात कोरोनाची तिसरीही लाट येणार आहे. याआधीच्या पहिल्या 2 लाटेत अनेकांनी जीव गमावला. मात्र तज्ज्ञांनानुसार ही तिसरी लाट नवजातांसाठी धोकादायक असणार आहे. नवजात बालकांना कोरोनाच्या लाटेत धोका असेल का, त्याचे परिणाम आणि लक्षणं काय असतील, हे आणि असे नानाविध प्रश्न पालकांना पडले आहेत. पालक वर्गाच्या या शंकाचं निरसन जैन यांनी केलं आहे. 

"नवजातांमध्ये कोणत्याही प्रकारे अँटीबॉडी नसतात. गर्भधारणे दरम्यान गर्भवतींना एक इंजेक्शन देण्यात येतो. कोरोना वायरल फ्लूचा एक धोकादायक स्वरुप आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक चिमुरड्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे या वरुन तिसऱ्या लाटेतही नवजातांना धोका असेल", असं जैन यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या : 

Covid-19 : लस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर चाचणी करणं गरजेचं आहे?

AIIMSच्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती; कोरोना प्रतिबंधक लस घेतली असेल तर...