नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसशी झुंजतोय. यामुळे लोकांचे जीवनच बदलले आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या शरीराचे रक्षण करणे सर्वात महत्त्वाचे ठरले आहे. रोग प्रतिकारशक्तीचे महत्व माणसाला कळू लागले आहे. मानवी शरीरात असलेल्या रोगांशी लढण्यास रोग प्रतिकारशक्ती मदत करते. यासाठी वेळोवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि आयुर्वेदाचार्य हे वेळोवेळी सल्ला देत असतात.
केंद्र सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मायगोव्हने जाहीर केलेल्या यादीमध्ये काही फळं, डार्क चॉकलेट आणि हळद दुधाचे प्रतिकारशक्ती वर्धक म्हटले आहे. नुकत्याच देण्यात आलेल्या माहितीनुसार, डार्क चॉकलेटचे अल्प प्रमाणात सेवन केल्यास ताणतणाव कमी होतो. रंगीत फळांच्या वापराबरोबर भाज्यांचे सेवन हे शरीरात पुरेसे जीवनसत्व आणि खनिज सेवन करण्यासाठी एक प्रभावी उपाय असल्याचे म्हटले जाते.
लोकांनी त्यांच्या जीवनशैलीत (Lifestyle) बरेच बदल केले आहेत. सकाळ-संध्याकाळची दिनचर्या पूर्णपणे बदलली गेली आहे. जर कोणी सकाळी कोमट पाण्याचे (Warm Water Benefits) सेवन करा. दिवसातून अनेक वेळा स्टीम (Steam) घ्या आणि गुरळ्या(Gargle) करा. जर एखाद्याला घश्याच्या इन्फेक्शनचा त्रास (Throat Infection Remedy) जाणवत असेल तर मधाचे पाणी (Honey Water) घेतल्यास आराम मिळतो, असे यात सांगण्यात आलंय.
सकाळी लवकर उठून रात्री लवकर झोपा. सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. सकाळी लवकर उठण्याने तुम्हाला सकारात्मक आणि ऊर्जावान वाटेल. सकाळी शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाशामुळे शरीर सक्रिय होते. याद्वारे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट राहाल. संपूर्ण झोप आरोग्यासाठी खूप महत्वाची असते. म्हणूनच आपण दररोज सकाळी उन्हात किमान 20 ते 30 मिनिटे बसायला हवे. सकाळचा सूर्यप्रकाश सौम्य असतो. उन्हात बसून तुम्हाला व्हिटॅमिन डी ऊर्जा मिळेल.