कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट आता मिळणार 5 मिनिटांच्या आत!

 संशोधकांनी अशी कोविड-19 टेस्ट विकसित केलीये, ज्यामध्ये अवघ्या काही मिनिटांत निकाल समोर येतोय.

Updated: Feb 9, 2022, 08:30 AM IST
कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट आता मिळणार 5 मिनिटांच्या आत! title=

बिजींग : कोरोनाची लागण झाली आहे याची खात्री करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट सध्याच्या घडीला अचूक मानली जाते. मात्र या टेस्टचा निकाल येण्यास बराच वेळ लागतोय. यासाठीच आता चीनमधील संशोधकांनी अशी कोविड-19 टेस्ट विकसित केलीये, ज्यामध्ये अवघ्या 4 मिनिटांत निकाल समोर येतोय. या तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या कोरोना चाचणीचा रिझल्ट आरटीपीसीआर चाचणीइतकाच अचूक असणार आहे.

आतापर्यंत अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान कोरोना टेस्टसंदर्भाक अनेक आव्हानंही समोर आली. टेस्ट करण्याची गरज लक्षात घेता चीनच्या संशोधकांनी मोठी गोष्ट समोर आणली आहे. चीनच्या फुदान विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत दावा केला आहे.

नेचर बायोमेडिकल इंजिनीअरिंग जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या एका आर्टिकलमध्ये, संशोधकांच्या टीमने सांगितलं की, स्वॅब्समधून जेनेटिक मटेरियलचं विश्लेषण करण्यासाठी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स वापरतात त्यांच्या सेन्सरचा वापर करून लॅब चाचण्यांसाठी लागणारा वेळ कमी करता येईल.

शास्त्रज्ज्ञांच्या टीमने सांगितंल की, आम्ही एकात्मिक आणि पोर्टेबल प्रोटोटाइप डिव्हाइसमध्ये SARS-CoV-2 शोधण्यासाठी इलेक्ट्रोमेकॅनिकल बायोसेन्सरचं इम्लांट केलं. ज्याच्या मदतीने 4 मिनिटांपेक्षा कमी वेळात व्हायरसची ओळख होण्यास मदत होते. या चाचणीच्या मदतीने कोरोना टेस्टचा अहवाल लवकर मिळून कामंही सोपं होईल.

फुदान विद्यापीठातील तज्ज्ञांनी सांगितलं की, एकदा ही चाचणी पद्धत विकसित झाली की, ती एअरपोर्ट, आरोग्य सुविधा आणि घरीही विविध परिस्थितींमध्ये वापरली जाऊ शकते.