मणिपूर : देशात प्रथमच कोरोना लस ही ड्रोनद्वारे पाठवण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मणिपूरमधून याची सुरुवात केली. दक्षिण पूर्व आशियात प्रथमच ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यात आला. ही लस मणिपूरमधील बिशनपूर इथून करंगला याठिकाणी पाठवण्यात आली.
या दोन्ही ठिकाणांचं अंतर रस्त्याच्या माध्यमातून 26 किमी आहे. यासाठी चार तासांचा प्रवास करून लस पोहोचवण्यात येतात. पण ड्रोनच्या माध्यमातून हे अंतर 15 किमी झालं. ICMRने ही लस अवघ्या 12-15 मिनिटांत त्या ठिकाणी पोहोचवली.
ड्रोनद्वारे कोरोना लस पाठवण्यास सोमवारपासून सुरूवात झाली. वास्तविक, आरोग्य कर्मचाऱ्यांना डोंगराळ आणि दुर्गम भागात ही लस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो, परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे ते आता खूप सोपं होईल.
ICMR ने मणिपूरमधील लोकांना टाक लेकद्वारे करंग बेटावर ड्रोनद्वारे कोरोना लस दिली. मेड इन इंडिया, हे ड्रोन स्वयंचलित मोडमध्ये हे ड्रोन उडालं आणि निर्धारित ठिकाणी सहज पोहोचलं.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ICMR, मणिपूर सरकार, तांत्रिक कर्मचारी यांचं अभिनंदन केलंय. ते म्हणाले, आत्ताच ही लस ड्रोनद्वारे देण्यात आली आहे. पण येणाऱ्या काळात, आणीबाणीच्या वैद्यकीय परिस्थितीतही, जीवन रक्षक औषधंही त्याद्वारे दिली जाऊ शकतात.
मणिपूरच्या करांग भागात सुमारे 3500 लोकसंख्या आहे. यामध्ये 30% लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आगामी काळात मणिपूरच्या आणखी दोन जिल्ह्यांमध्ये अशा ड्रोनच्या मदतीने लस देण्याची योजना आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आता 100 कोटी डोसचा आकडा लवकरच पूर्ण होणार आहे.