Bharat Biotech Nasal Vaccine Price: चीनसह काही देशांमध्ये कोरोनाने (Coroanvirus) पुन्हा थैमान घातलंय. जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारत सरकार (Central Government) अलर्ट मोडवर (Alert) आलं आहे. देशातील नागरिकांना सतर्कचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या या संकटात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचा (Bharat Biotech Nasal Vaccine) लसीकरण मोहिमेत (Covid 19 Vaccination Drive) समावेश केला आहे. याबरोबरच सरकारने याची किंमतही निश्चित केली आहे.
नाकेवाटे दिला जाणाऱ्या लसीची किंमत ठरली
भारत बायोटेकच्या नेजल वॅक्सीनची किंमत खासगी रुग्णालयांमध्ये 800 रुपये + 5 टक्के जीएसटी, शिवाय खासगी रुग्णालय यात आपले चार्ज जोडू शकतात. तर सरकार रुग्णालयात या लसीची किंमत 325 रुपये इतकी असणार आहे. सध्यातरी ही लस फक्त खासगी रुग्णालयांमध्ये आणि केंद्रांमध्येच उपलब्ध होईल. भारत बायोटेकने नाकावाटे घेण्यात येणारी 'इन्कोव्हॅक' (iNCOVACC) लस तयारी केलीय.
कधी मिळणार नाकावाटे लस?
नाकावाटे दिली जाणाऱ्या लसीचा (Nasal Vaccine) अद्याप वापर सुरु करण्यात आलेला नाही. पण सरकारच्या कोविन पोर्टलवर या लसीचा समावेश करण्यात आला असून काही दिवसातच कोविन अॅपवर ही लस उपलब्ध होईल. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यात ही लस खासगी केंद्रात पोहोचण्याची शक्यात आहे त्यानंतर जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात ही लस सामान्य लोकांसाठी उपलब्ध होईल.
कोणाला दिली जाणार ही लस?
भरत बायोटेकच्या नाकेवाटे दिल्या जाणाऱ्या लसीला मंजूरी मिळाल्यानंतर ही लस 18 वर्षांवरील व्यक्तींना दिली जाणार आहे. 18 वर्षांवरील ज्या व्यक्तींनी अद्याप बूस्टर डोस घेतलेला नाही, त्या लोकांना ही लस दिली जाऊ शकते. याआधी भारत बायोटेकची कोवॅक्सिन (Covaxin), सीरम इन्स्टीट्यूटची (Serum Institute of India ) कोविशील्ड (Covishield) आणि कोवोवॅक्स (Covovax), रशीयाची स्पुतनीक वी (Sputnik V) आणि बायोलॉलिजकर ई लिमिटेडची कॉर्बेवॅक्स (Corbevax) लस लोकांना देण्यात आली आहे.
हे ही वाचा : Smartphone Battery : 10, 20 की 30 टक्के... मोबाईल फोन कधी चार्जिंग करावा?
कशी दिली जाणार नाकावाटे लस
या लसीचे दोन्ही नाकपुड्यांमध्ये प्रत्येकी चार थेंब टाकायचे आहेत. तसेच 28 दिवसांनंतर लसीची दुसरी मात्रा घ्यावी लागणार आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस उपलब्ध आहे. पण इंजेक्शनची (Injection) भीती असलेल्यांनी ही लस घेतलेली नाही. त्यामुळे सरकारने नाकावाटे घेता येणारी लस उपलब्ध केलीय.