नवी दिल्ली : जगभरात लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसच्या स्रोताबाबत मोठा खुलासा झालाय. एका नवीन संशोधनात, तज्ज्ञांनी असा विश्वास आहे की, दोन भिन्न कोरोना व्हायरस चीनच्या वुहान बाजारात थेट विकल्या जाणार्या प्राण्यांमध्ये पसरल्याची शक्यता आहे. याद्वारे तो मानवात पसरला आणि ही महामारी जगभर पसरली.
जूनच्या सुरुवातीला, जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केली होती की, शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतील लीकसह कोरोना व्हायरसचे सर्व संभाव्य स्त्रोत शोधण्यासाठी संशोधन सुरू ठेवावं.
कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेतून व्हायरस लीक झाल्याचा दावा केला जात होता. परंतु कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने हा व्हायरस सर्वप्रथम प्राण्यांच्या बाजारात आढळून आल्याचा शोध लावला. त्यानंतर या मार्केटमधून हा व्हायरस सगळीकडे पसरला होता.
सायन्स जर्नलने मंगळवारी एक ऑनलाइन संशोधन प्रकाशित केलं, ज्यामध्ये असं म्हटलंय की, कोरोना महामारीचे प्रारंभिक केंद्र वुहानमधील प्राणी बाजार होतं आणि व्हायरस प्राण्यांपासून मानवापर्यंत पसरलंय.
इम्यूनोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागातील प्राध्यापक आणि संशोधनाचे सह-लेखक क्रिस्टियन अँडरसन म्हणाले की, संशोधन वुहानमधील या बाजारपेठेतून विषाणू पसरल्याचं सूचित करतं. जोपर्यंत मी या प्रकरणाचा पूर्णपणे तपास केला नव्हता, तोपर्यंत मला समजले की हा विषाणू लॅबमधूनच बाहेर पडलाय.