Measles Outbreak : मुंबईसह (Mumbai Measles) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातत गोवरचा उद्रेक झालाय, संशयित गोवर (Measles) रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पार झाली आहे. तर गोवरची लागण झालेले सातशेच्या आसपास रुग्ण राज्यात आहेत. आतापर्यंत 13 बालकांना (Measles Death) गोवरमुळे आपले प्राण गमवावे लागलेत. आता याच गोवर फैलावाच्या पार्श्वभूमीवर गोवरसाठी विलगीकरण (Quarantine) व्यवस्था तयार निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्याच्या विचारात सरकार आहे.
गोवरची लागण झालेल्या मुलांना किमान सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवावं, यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. विशेष म्हणजे राज्यातील 50 ट्क्यांपेक्षा गोवरचे रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत आणि गोवरची सर्वाधिक लागण ही चिमुरड्यांना होतेय असं समोर आलंय. त्यामुळे लसीकरणाबाबतीत टास्क फोर्सनं महत्त्वाचे निर्देश दिलेत.
राज्यात गोवरचा कहर वाढताना दिसतोय. मात्र सर्वाधिक धोका मुंबई परिसरामध्ये आहे. कारण मुंबईत संसर्गजन्य आजार सर्वाधिक वेगाने पसरतात हे कोरोना काळात सर्वांनीच पाहिलंय. त्यामुळे टास्क फोर्सनं गोवरला रोखण्यासाठी आता रुग्णांना क्वारंटाईन करण्यासंबंधी चर्चा केल्याचं समजतंय. त्यामुळे सर्वांनीच नियम पाळून काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनासारखंच गोवरही थैमान घालण्याची शक्यता आहे.
ज्या बालकांना लस देण्यात आलेली नसते अशा मुलांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका होण्याची शक्यता असते. याशिवाय गरोदर महिलांनाही गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते. तसंच लसीकरण न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला गोवर होऊ शकतो.