Coronavirus: अमेरिका कोरोनाच्या विळख्यातून मुक्त? तज्ज्ञांचा मोठा दावा

कोरोना व्हायरस हा जगातील बहुतेक भागांमध्ये महामारीच्या स्वरूपात दिसून येतोय.

Updated: Apr 28, 2022, 11:56 AM IST
Coronavirus: अमेरिका कोरोनाच्या विळख्यातून मुक्त? तज्ज्ञांचा मोठा दावा title=

मुंबई : कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतोय. यामुळे पुन्हा एकदा जगावर कोरोनाचं संकट दिसत असताना अमेरिकेच्या संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ डॉ एंथनी फाउची यांनी, अमेरिकेत कोरोनाच्या महामारीचा काळ निघून गेला असल्याची माहिती दिली आहे. 

डॉ. फाऊची यांच्या म्हणण्याप्रमाणे, सध्या असं दिसून येतंय की, कोरोनाची महामारी आता प्रादेशिक महामारी बनत चालली आहे. ही महामारी काही क्षेत्रांमध्ये नियमितपणे डोकं वर काढताना दिसते. 

डॉ. फाऊची यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितलं की, कोरोना व्हायरस हा जगातील बहुतेक भागांमध्ये महामारीच्या स्वरूपात दिसून येतोय. त्यामुळे अमेरिकेत धोका टळलेला नाही. 

हिवाळ्यात ओमायक्रॉनने नुकसान

फाउची म्हणाले, "एका दिवसात नऊ लाख नवीन प्रकरणे नोंदवली जात नाहीत आणि हजारो लोकांना रुग्णालयात दाखल केलं जात नाहीये. शिवाय इतक्या इतक्या मोठ्या संख्येने मृत्यूही होत नाहीत." 

फाउची यांनी बुधवारी वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राला दिलेल्या विधानाचं स्पष्टीकरण देताना सांगितलं की, ओमायक्रॉनने हिवाळ्यात मोठा हाहाकार उडवून दिला होता. 

दरम्यान जागतिक आरोग्य संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, जागतिक स्तरावर कोविड-19 ची प्रकरणं आणि मृत्यूंची संख्या कमी होत असली तरी महामारी अजून संपलेली नाही. कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये घट होण्याचं कारण देखील मोठ्या प्रमाणात चाचणीचे दर कमी झाल्यामुळे असल्याचं म्हटलं जातंय.