मुंबई : भारतात कोविड 19 च्या अधिक संसर्गजन्य वेरिएंट डेल्टाचं नवं रूप समोर आलं आहे. याला AY.1 किंवा डेल्टा+ असं नाव देण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हा वेरिएंट मोनोक्लोनल एंटीबॉडी कॉकटेल औषधाचा प्रभाव कमी करतो. हे औषध कोरोनाच्या विरूद्ध एक चांगलं आणि प्रभावी मानलं जातं.
भारतात पहिल्यांदा नोंदवला गेलेला डेल्टा वेरिएंट फार धोकादायक ठरला होता. असं मानलं जातंय की, डेल्टा वेरियंटने पुन्हा एकदा म्युटेशन करून AY.1 किंवा डेल्टा+ या म्यूटेंटमध्ये स्वतःला बदललं आहे. हा वेरिएंट मोनोक्लोनल एंटीबॉडी कॉकटेल औषधाचा प्रभाव कमी करतो जे कोरोनाबाधित रूग्णांसाठी फार धोकादायक ठरू शकतं.
गेल्या शुक्रवारपर्यंतच्या मिळालेल्या माहितीप्रमाणे, भारतात 7 जूनपर्यंत डेल्टा+चे 6 प्रकरणं समोर आली होती. दिल्ली आणि जेनोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ फिजीशियन आणि कॉम्प्यूटेशनल बायोलॉजिस्ट डॉ. विनोद स्कारिया म्हणाले, K417N बद्दल सर्वात महत्वाची म्हणजे म्यूटेंट मोनोक्लोनल एंटीबॉडी Casirivimab आणि Imdevimab देखील प्रभावी ठरू शकत नाहीत.
सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन के आदेशानुसार, देशातील कोविड 19च्या उपचारात या कॉकटेलच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे.
K417N म्यूटेशनची वेरिएंट फ्रीक्वेंसी भारतात खूप कमी आहे. डॉ. स्कारिया यांनी नव्या म्यूटेंटला डेल्टा+ नाव देत जसंजसं नवं म्यूटेशन होईल तसा डेल्टा विकसी होत जाईल, हे समजणं आव्हानात्मक आहे, असं म्हटलंय.