भारताला Diabetesची राजधानी बनवतात 5 फूड; ICMR च्या अभ्यासात मोठा खुलासा

भारताला डायबिटिसची राजधानी म्हणून ओळखलं जातं. येथे 10 कोटीहून अधिक लोकांना मधुमेह आहे. या गंभीर आजारापासून लढण्यासाठी ICMR ने नुकताच रिसर्च केला होता. यामध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 9, 2024, 12:42 PM IST
भारताला Diabetesची राजधानी बनवतात 5 फूड; ICMR च्या अभ्यासात मोठा खुलासा title=

भारतात मधुमेह या आजाराचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. डायबिटिस सारख्या आजाराची राजधानी म्हणून भारताला संबोधल जातं. भारतीय लोकांची जीवनशैली या आजाराचं मुख्य कारण असल्याचं म्हटलं जातं आहे. या गंभीर आजारापासून लढण्यासाठी ICMR ने एक संशोधन केलं आहे. यामध्ये डायबिटिसचा धोका कमी करण्यासाठी काही उपाय देखील सुचवले आहेत. इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ रिसर्च (ICMR) आणि मद्रास डायबिटिस रिसर्च फाऊंडेशन, चेन्नई यांच्या सहमताने संशोधनात करण्यात आले. यामध्ये लो-AGE (Advanced Glycation End Products) या डाएटमुळे डायबिटिसचा धोका कमी होणार असल्याचं सांगितलं आहे. 

या अभ्यासात 25 ते 45 वर्षाच्या 38 लठ्ठ आणि वजन जास्त असलेल्या व्यक्तांची समावेश आहे. ज्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) 23 किंवा त्यापेक्षा अधिक आहे. अभ्यासादरम्यान 12 आठवड्यांपर्यंत त्या व्यक्तींना दोन पद्धतीचे डाएट देण्यात आले. एक हाय AGE आणि दुसरा लो AGE डाएट. संशोधनातून आलेल्या निष्कर्षानुसार, लो AGE डाएटमधून इंसुलिन सेंसिटिविटीमध्ये महत्वपूर्ण सुधारणा झाला. या डाएटनंतर AGEs शरीरातील सूज कमी झाल्याचं दिसलं.

काय आहे AGEs?

AGEs हे हानिकारक पदार्थ आहेत जे काही पदार्थ उच्च तापमानात शिजवल्यावर तयार होतात, विशेषतः तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ. या घटकांमुळे शरीरात जळजळ, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

कोणत्या पदार्थांमुळे वाढतोय डायबिटिस? 

* तळलेले पदार्थ: चिप्स, चिकन, समोसे, भजी
* भाजलेले पदार्थ: कुकीज, केक, क्रॅकर्स
* प्रक्रिया केलेले पदार्थ: तयार जेवण, मार्जरीन, अंडयातील बलक
* उच्च तापमानात शिजवलेले प्राणी-आधारित पदार्थ: ग्रील्ड किंवा भाजलेले मांस जसे की बेकन, गोमांस, पोल्ट्री
* भाजलेले काजू: सुकी फळे, भाजलेले अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया

हे पदार्थ भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि तळणे, भाजणे, ग्रिलिंग आणि बेकिंग यांसारख्या स्वयंपाकाच्या पद्धती त्यांची AGE पातळी वाढवतात. प्रक्रिया केलेले आणि तेलकट पदार्थ टाळून आणि ताजे, संपूर्ण अन्नाचा समावेश केल्यास मधुमेहाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.