मान सतत दुखतेय? त्रास करुन घेऊ नका, आजच 'या' गोष्टी बदला...

अनेकांचीच इथं सतत तक्रार असते, की मान आणि पाठ प्रचंड दुखतेय. वेदना असह्य होत आहेत. 

Updated: Feb 14, 2022, 06:01 PM IST
 मान सतत दुखतेय? त्रास करुन घेऊ नका, आजच 'या' गोष्टी बदला...  title=
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

मुंबई : दिवसभर काम, सतत संगणक किंवा मोबाईलवर राहणं या साऱ्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये दुखणी वाढली आहेत. ही बाब कोणीही नाकारणार नाही. कारण, हेच सध्याच्या दिवसांचं वास्तव आहे. काम , पैसा, नोकरी या साऱ्याच्या मागे धावत असताना आपण आपल्या आरोग्याकडे आणि शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करु लागलो आहोत. (Neck pain)

अनेकांचीच इथं सतत तक्रार असते, की मान आणि पाठ प्रचंड दुखतेय. वेदना असह्य होत आहेत. 

हे सर्व होत असताना काही गोष्टींमध्ये बदल करणं आणि त्या अनुशंगाने आपल्याला सवयी लावणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. 

झोपण्याची अयोग्य पद्धत
सकाळी झोपेतून उठल्यानंतर मान दुखण्याची कैक कारणं असतात. यामध्ये मुख्य कारण असतं चुकीच्या पद्धतीनं झोपणं. पोटावर झोपणं टाळणं यामध्ये फायद्याचं ठरतं. 

चांगली उशी 
चांगल्या पद्धतीची उशी नसल्यासही त्याचा त्रास मानेला होतो. रात्री जवळपास 8 तास तुम्ही उशीवर डोकं ठेवून झोपता. अशा परिस्थितीमध्ये उशी ही चांगलीच असावी. 

सतत बसून राहणं
कामाचा भाग असो किंवा आणखी काही कारण, सतत दीर्घकाळासाठी बसून राहणं मानेसाठी वेदनादायी ठरतं. यामुले नर्व कंप्रेशन आणि ऑस्टियोअर्थराइटिस असे त्रास उदभवतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचं मार्गदर्शन फायद्याचं ठरतं. 

आइस पैक या हीट पैक

योग्य व्यायाम
घरच्या घरीच काही व्यायाम प्रकार करणं मानेच्या वेदना कमी करण्यासाठी फायद्याचं ठरतं. सकाळी उठल्यानंतर मान हळुवारपणे डाव्या आणि उजव्या बाजुला फिरवणं हा यातीलच एक प्रकार. 

मान गोलाकार पद्धतीने पाच वेळा उजवीकडून आणि पाच वेळा डावीकडून फिरवणंसुद्धा यामध्ये फायद्याचं ठरतं. 

आईस किंवा हिट पॅक 
मान आणि पाठीचा भाग जास्त दुखत असल्यास वेदना होणाऱ्या भागात आईस पॅक किंवा हिट पॅकचा वापर फायद्याचा ठरतो. 

मान आणि पाठदुखीच्या तक्रारी सध्या फार कमी वयातच सुरु होतात. पण, यासाठी चांगल्या जीवनशैलीचा स्वीकार करणं हा एक उपाय सर्वाधिक फायद्याचा ठरणार आहे हे नाकारता येत नाही.