आंबा खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या काय आहे सत्य!

आता प्रश्न असा आहे की आंबा खाल्ल्याने वजन कमी होते की नाही?

Updated: Apr 27, 2022, 02:23 PM IST
आंबा खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या काय आहे सत्य! title=

मुंबई : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहे. या सिझनमध्ये आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. आंबे खाण्यासाठी अनेकजण या सिझनची आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा हे फळ सर्वांनाच आवडतं. याव्यतिरिक्त, हे आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी मानलं जातं. पण वजन कमी करण्याचा विचार केला तर आंबा खाल्ल्याने वजन वाढतं असं अनेकांचं मत आहे. तर आता प्रश्न असा आहे की आंबा खाल्ल्याने वजन कमी होते की नाही?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आंबा खाल्ल्याने वजन कमी होत नाही. वेट लॉटसाठी, तुम्ही काही प्रमाणात आंबा खाऊ शकता, दररोज सुमारे 1 ते 2 स्लाइज. मात्र, जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन मोठ्या प्रमाणात टाळावं. जर तुम्ही आंबा मोठ्या प्रमाणात खाल्ले तर तुमच्या शरीराचे वजन कमी होत नाही. 

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आंब्याचं सेवन कसं करावं?

जास्त प्रमाणात आंब्याचं सेवन करू नये. अधिक प्रमाणात आंब्याचं सेवन केल्याने वजन वाढू शकतं. आंब्यामध्ये कॅलरीचं प्रमाण जास्त असतं. अशात जर तुम्ही जास्त कॅलरी घेत असाल तर वेट लॉसच्या प्रक्रियेता काही फायदा नाही.

आंबा नेमका कधी खावा?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, काही लोकं जेवण झाल्यानंतर आंबा खातात. मात्र असं करू नये. जेवणानंतर आंबा खाणं ही चुकीची पद्धत आहे. या काळात तुम्ही अधिक कॅलरीज इन्टेक करता. त्यामुळे नेहमी दुपारच्या वेळेस आंबा खाल्ला पाहिजे. ही आंबा खाण्याची चांगली वेळ आहे.