बॉम्बे ब्लड ग्रुप! फक्त भारतातच आढळतो हा दुर्मिळ रक्तगट

शरीराला जिवंत ठेवणाऱ्या घटकांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त. कारण रक्ताशिवाय शारीरिक यंत्रणा चालवली जाऊच शकत नाही. अशा या रक्ताचे वैद्यकीय क्षेत्रात फार महत्त्व आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 22, 2024, 11:06 PM IST
बॉम्बे ब्लड ग्रुप! फक्त भारतातच आढळतो हा दुर्मिळ रक्तगट title=

Bombay Blood Group History : सर्वांनाच रक्तगट अर्थात ब्लड ग्रुप माहित आहेत.  ए,  बी, ओ आणि एबी हेच ब्लड ग्रुपचे प्रकार सर्वांना माहित आहेत.  मात्र, या व्यतीरीक्त आणकी एक ब्लड ग्रुप आहे. हा ग्रुप मिळून एकूण पाच ब्लड ग्रुप्स आहेत. अनेकांना या पाचव्या ब्लड ग्रुप बद्दल काहीच माहिती नाही. म्हणून हे कुतूहलाचे भाव चेहऱ्यावर उमटतात. चला तर आज या पाचव्या अज्ञात ब्लड ग्रुप बद्दल जाणून घेऊया. या पाचव्या प्रकारच्या ब्लड ग्रुप चे नाव आहे बॉम्बे ब्लड ग्रुप! (Bombay Blood Group) याला ओएच (Oh)म्हणून देखील ओळखले जाते. फक्त भारतातच हा दुर्मिळ रक्तगट आढळतो. 

मुंबईत लागला या  ब्लड ग्रुपचा शोध

या ब्लड ग्रुपचा शोध 1952 साली वाय एम भेंडे नावाच्या डॉक्टरांनी पूर्वीच्या मुंबई मध्ये अर्थात बॉम्बे मध्ये लावला होता म्हणून त्याला बॉम्बे हे नाव पडले. आपण सर्वजण असे समजतो की ओ निगेटिव्ह अथवा एबी निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप सर्वात दुर्मिळ असतो कारण हा ब्लड ग्रुप फारच कमी लोकांमध्ये आढळला जातो. पण तसे नाही आहे कारण ओ निगेटिव्ह पेक्षाही दुर्मीळ ब्लड ग्रुप आहे बॉम्बे ब्लड ग्रुप! हा ब्लड ग्रुप जगाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 0. 04% लोकसंख्येमध्येच आढळतो सोप्या शब्दात सांगायची झाले तर दर 10 लाख लोकांच्या मागे केवळ चार जण या ब्लड ग्रुपचे आढळतात.

ठाणे येथील कै. वामनराव ओक रक्तपेढीचे पी. आर. ओ. सुरेन्द्र बेलवलकर यांनी याबाबत अधित माहिती दिली. या प्रकारच्या ब्लड ग्रुप मध्ये असणारे अँटीजन H हेच या ब्लड ग्रुपच्या दुर्मिळ असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. ही अँटीजन H अन्य कोणत्याही ब्लड ग्रुप मध्ये आढळत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीचे रक्त इतर ब्लड ग्रुप मधील व्यक्तीला चालू शकते, परंतु इतरांचे रक्त बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीला चालत नाही. या व्यक्तींना केवळ बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीच रक्त देऊ शकतात असे बेलवलकर यांनी सांगितले .

मुंबईच्या अवघ्या 0. 01% लोकसंख्येमध्ये हा ब्लड ग्रुप आहे. त्यामूळे ज्यांना आपला ब्लड ग्रुप माहित नाही त्यांनी लवकरात लवकर टेस्ट करून आपला ब्लड ग्रुप जाणून घ्या. कुणास ठाऊक हा ब्लड ग्रुप तुमचा देखील असायचा आणि तुम्ही देखील दुर्मिळ ते दुर्मिळ मनुष्य म्हणून पुढे याल असे बेलवलकर म्हणाले. एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास आणि तिला वेळेवर रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचण्याची महत्वपूर्ण कार्य रक्त करते. म्हणूनच रक्तदान करण्याचे आवाहन केले जाते ,ज्यामुळे गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतील.