सर्व खेळ सौंदर्याचा...; असं का म्हणाली Sara Ali Khan

'परफेक्ट बॉडी... Sara Ali Khan चा वजन कमी करण्याचा प्रवास वाचून तुम्ही व्हाल हैराण  

Updated: Dec 16, 2022, 01:58 PM IST
सर्व खेळ सौंदर्याचा...; असं का म्हणाली Sara Ali Khan title=
bollywood actress sara ali khan weight loss journey motivational story bollywood news marathi nz

Sara Ali Khan Weight Loss Journey: आपण सगळेच वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी नवनवीन प्रयोग नेहमीच करत असतो. काहीजण शस्त्रक्रिया करुन घेतात तर काही नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स वापरतात. आपण अनेकदा इतरांकडून प्रेरणा घेत असतो. तुम्हाला माहितच असेल की बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) अभिनेत्री बनण्याच्या इच्छेने तिने बरेच वजन कमी केले होते. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पदवीच्या दुसऱ्या वर्षात असताना तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ही इच्छा तिनं सर्वात आधी आई अमृता सिंग (Amrita Singh) यांना सांगितली. त्यावेळी साराचे वजन 96 किलो होते, अशा परिस्थितीत तिच्या आईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.

 

जेव्हा साराने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला

सारा अली खानने 3 वर्षांपूर्वी 'वी द वुमन' (We The Women) नावाच्या एका कार्यक्रमात सांगितले होते, मी एक लठ्ठ मुलगी होती, मला अजूनही पीसीओडी (PCOD) आजार आहे. मी पलंगावर बसून रडत होतो, आणि म्हणत होते की आई मला अभिनेत्री व्हायचे आहे, मग तिनं मला वजन कमी करायला सांगितले, वजन कमी करायला मला जवळपास एक वर्ष लागले.'

 

वजन 40 किलो पर्यंत कमी झाले

सारा अली खानने सांगितले की ती बबली आणि फूडी आहे. अभ्यासासाठी ती अमेरिकेत गेली तेव्हा तिचे वजन थोडे वाढले होते. या अभिनेत्रीने दीड वर्षात 40 किलो वजन कमी केले. वजन कमी करण्याच्या प्रवासादरम्यान, तिने जंक फूड पूर्णपणे सोडून दिले आणि व्यायाम करण्यास सुरुवात केली. वयाने लहान असल्यामुळे तिच्या शरीराने पटकन प्रतिसाद दिला आणि तिचे वजन लवकर कमी झाले.

 

बॉडी शेमिंगवर सारा काय म्हणाली?

सारा अली खाननेही बॉडी शेमिंगबद्दल मोकळेपणाने सांगितले, ती म्हणाली, 'परफेक्ट बॉडी इमेजबाबत अजेंडा सुरू आहे, कोण ठरवेल की परफेक्ट काय आहे. तुम्ही स्वस्थ राहणं हेच परफेक्ट आहे.

 

माझं प्रोफेशन अवलंबून

सोशल मीडियावर एका विशिष्ट पद्धतीने दिसण्याचा दबाव असल्याचे सारा म्हणाली, 'मी या आत्मविश्वासाने मोठी झाली आहे की तुम्ही कसे दिसता याने काही फरक पडत नाही. पण आता मी कशी दिसते यावर माझं प्रोफेशन अवलंबून आहे, हो, थोडंसं दडपण आहे, पण ते तितकं अवघड नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो, म्हणून वेळोवेळी स्वतःला सांगत राहा की तुम्हाला काय वाटेल ते तुम्हीच ठरवायचे आहे, कारण लोक त्यांना काय म्हणायचे आहे ते सांगतील.

 

PCOD म्हणजे काय?

सारा अली खानला पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसीज नावाचा आजार आहे, ज्याला पीसीओडी म्हणतात. ही महिलांची एक सामान्य समस्या आहे जी हार्मोन्सच्या असंतुलनामुळे उद्भवते. यामुळे पीडित महिलेच्या शरीरात एन्ड्रोजनची पातळी वाढते आणि अंडाशयांवर सिस्ट तयार होऊ लागतात. अशा स्थितीत महिलांचे वजनही झपाट्याने वाढते.