Benefits of Spinach Hot Water: हिवाळ्याचे दिवस आता सुरू झाले आहे. त्यामुळे आता आपल्याला आरोग्यदायी आहार खायला सुरूवात करायला हवी. त्यातून आपण आपल्या रोजच्या जीवनात भाज्या खातो. आता बाजारात ताज्या पालेभाज्याही (Green Vegatables) येऊ लागल्या आहेत. आपल्यात आहारात आपण अशा अनेक भाज्यांचा समावेश करू शकतो ज्यांच्या आपल्या आरोग्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो आणि त्यासोबतच थंडीपासूनही आपलं संरक्षण होईल. सध्या अनेकांनी आपल्या आहारात पोषकतत्वे (health benefits) असणाऱ्या भाज्या खायला सुरूवात केली असेलच त्यातून आता तुम्ही या एका पालेभाजीकडेही विशेष लक्ष द्या. कारण ज्याच्या पाण्यानं तुमच्या शरीराला चांगला फायदा होऊ शकतो. ती पालेभाजी आहे पालक. पालकाचे पाणी तुमच्या आमच्या आरोग्याच्या फायद्याचे आहे. (these are the health benefits of hot water after boiling spinach in it know what)
पालकाची फक्त भाजीच नाही तर पराठे करूनही आपण खाऊ शकता. अनेकजण पालक उकळल्यानंतर (hot water) गरम पाणी फेकून देतात. जे पाणी ते कचरा समजून फेकून देतात पण लोकहो, तो कचरा नाही तर त्याच आरोग्यासाठी अनेक पोषक घटक आहेत हेही अनेकांना महिती नसते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया पालेभाजी पालकाच्या पाण्याचे फायदे.
पालक उकळल्यानंतर त्यातील सर्व पाने काढून घ्या. यानंतर उरलेले पाणी गाळून ग्लासमध्ये भरून घ्या. नंतर त्यात काळे किंवा पांढरे मीठ टाका आणि चहा प्रमाणे चुटकीसरशी प्या.
प्रतिकारशक्ती वाढते
पालकाच्या उरलेल्या गरम पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्ससह (proteins) अनेक पोषक घटक असतात. ज्याच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
कोमट पालक पाणी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्या पाण्यात व्हिटॅमिन-ए (Vitamin A) असते जे दृष्टी सतेज करण्यासाठी मदत करते. यासोबतच यामध्ये ल्युटीन (Lutin) आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटी-ऑक्सिडंट (antioxidants) देखील आहेत ज्याने डोळ्यांच्या पेशी मजबूत होतात.
त्वचेसाठी उपयुक्त
पालक उकळल्यानंतर बाहेर येणारे गरम पाणी (Spinach Water Benefits) प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडू लागतात. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमांची समस्या कमी होते. हे पाणी प्यायल्यानं रक्ताभिसरणही सुधारते.
केस मजबूत आणि सुंदर होतात
डोक्याच्या केसांसाठी गरम पालक पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. त्यात प्रथिने आणि लोह (iron) असते. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस पांढरे होण्याचा वेगही कमी होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)