तुम्हीदेखील बसल्याबसल्या नखं चावता का? दातांचे होऊ शकते गंभीर नुकसान

Nail Biting Side Effects: तुम्हालाही नखं चावण्याची सवय आहे का? आत्ताच सावध व्हा कारण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. वाचा सविस्तर 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 30, 2023, 04:54 PM IST
तुम्हीदेखील बसल्याबसल्या नखं चावता का? दातांचे होऊ शकते गंभीर नुकसान title=
biting your nails is affecting your health know the Side Effects in marathi

Nail Biting Side Effects:  तसं पाहायला गेलं नख चावण्याची सवय ही खूपच सामान्य आहे.. लहान मुलांपासून तरुणांमध्येही ही सवय आहे. चित्रपट पाहत असताना किंवा एखाद्या विचारात असताना आपल्या नकळतच आपण नखं चावत बसतो. तर, काही जणांना टेन्शन आल्यावर किंवा घाबरल्यावर नख चावण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी महागात ठरु शकते. आरोग्याबरोबरच दातासाठीदेखील महागात पडते. (Nail Biting Causes In Marathi)

लोकं नखं का चावतात?

लोकं नखं का चावतात या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकते. एका अहवालानुसार, नखं चावून लोकं आपल्या भावनांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण ही सवय घातक ठरु शकते. कारण याचा तुमच्या हास्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

नखं चावण्याची सवय आणि डेंटल हेल्थ

अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या अहवालानुसार, नखं चावण्याच्या चुकीच्या सवयीमुळं तुमचे दात तुटू शकतात. जर, तुमच्या दातांना ब्रेसेस लावण्यात आलेले आहेत तर नखं चावल्यामुळं दातांची मुळे सडू शकतात. त्यामुळं दात खराब होण्याचा धोका वाढतो.

नखं चावणाऱ्या लोकांना ब्रुक्सिज्म नावाचा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. ब्रुक्सिजमला सामान्य भाषेत दातांची झीज होणे असंही म्हणतात. कळत-नकळत आपल्याकडून ही चूक होत असते. पण आयुष्यभर त्याचा परिणाम होऊ शकतो. या सवयीमुळं डोकेदुखी, चेहरा दुखू लागणे, दात सेन्सेटिव्ह होणे इतकंच नव्हे तर दात खराब होण्याची शक्यताही आहे. 

नख चावण्याच्या सवयीमुळं दातांचे तर नुकसान होतेच पण त्याचबरोबर नखांमधील बॅक्टेरियादेखील पोटात जाण्याची शक्यता असते. दातांमध्ये  ई.कोली आणि साल्मोनेला सारख्या खतरनाक आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया तयार होऊ शकतात. जेव्हा तुम्ही तुमची नखं चावता तेव्हा तोंडावाटे पोटात जातात. त्यामुळं गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सारखा गंभीर आजार होऊ शकतो. जे लोक नेहमी नखे चावतात त्यांना पॅरोनिचिया होण्याचा धोका जास्त असतो. या समस्येमुळे संसर्ग, सूज, बोटांमध्ये पू भरणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. 

नखं चावण्याच्या सवयीपासून कसा सुटका कशी मिळवाल?

अमेरिकन अॅकेडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशन यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्या वापरुन तुम्ही नखं चावण्याच्या सवयीपासून सुटका मिळवू शकता. 

नखे नेहमी लहान ठेवा

नखांवर थोडी कडू नेलपॉलिश लावा

जेव्हा जेव्हा तुम्हाला नखे ​​चाववसं वाटतं तेव्हा अशा स्थितीत मन दुसरीकडे वळवा आणि नखे चावण्याऐवजी स्ट्रेस बॉल हातात घ्या.

तुम्ही कोणत्या परिस्थितीत नखे चावता हे शोधणे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत या काळात इतर कामात मन रमवा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)