मुंबई : मेडिकल सायन्समध्ये सध्या अनेक अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जातो. असंच एक म्हणजे आयव्हीएफ. मात्र अमेरिकेत आयव्हीएफदरम्यान Fusionमध्ये झालेली चूक एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. 12 वर्षांनंतर जेव्हा त्याने आपल्या मुलाची डीएनए चाचणी केली, तेव्हा हे सत्य बाहेर आलं. आता पीडित व्यक्तीने क्लिनिकच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे.
अमेरिकेतील उटाह इथे राहणारे डोना आणि वन्नेर जॉन्सन या जोडप्यासोबत एक जीवन बदलणारी घटना घडली. दोन मुलांचे आई -वडील बनलेल्या या जोडप्यापुढे 12 वर्षांनंतर मुलाबद्दलचं धक्कादायक सत्य समोर आलंय. जेव्हा वन्नेर यांनी मोठ्या मुलाची डीएनए चाचणी केली, तेव्हा असं दिसून आलं की तो त्याचा मुलगा नाही.
Nzherald या वेबसाईटच्या अहवालानुसार, डोना आणि वन्नेर जॉन्सन आधीच एका मुलाचे वडील होते. त्यांना दुसरा मुलगा हवा होता, ज्यांच्यासाठी त्यांनी 2007 मध्ये IVF द्वारे दुसऱ्यांदा गर्भधारणा केली. त्यावेळी ते पुन्हा पालक बनले.
त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाचा जन्म आयव्हीएफ द्वारे झाला होता. परंतु जेव्हा डिएनएचा रिझल्ट आलार आला, तेव्हा असं दिसून आलं की, आयव्हीएफ प्रक्रियेसाठी कोणा दुसऱ्याचे शुक्राणू घेतले गेले होते. अहवाल पाहिल्यानंतर आयव्हीएफ केलेल्या क्लिनिकवर या जोडप्याने गुन्हा दाखल केला.
जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली गेली तेव्हा असे आढळून आले की, एग फ्यूजनमध्ये चूक झाली आहे आणि डोनाच्या एगचं फ्यूजन तिच्या पतीच्या शुक्राणूने नाही तर इतर कोणासोबत झालं आहे.
हे सत्य जाणून घेतल्यानंतर, डोना आणि वेन्नर जॉन्सन यांना फार दुःख झालं आहे. या दोघांनी या प्रकरणाबाबत कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान त्यांनी हे सत्य आपल्या मुलाला एका वर्षाने सांगितलं. त्यानंतर त्याच्या खऱ्या वडिलांचा शोध देखील सुरू करण्यात आला आहे.