मुंबई : आता गृहिणींना (Housewives) सावध करणारी बातमी. स्वयंपाकाचा आत्मा म्हणजे मसाले. (spices) पण या मसाल्यांमध्येच भेसळ (Adulterated spices) केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मसाल्यात भेसळ (spice in Adulterated) करुन तुमच्या जिवाशी कसा खेळ होतोय?
तुम्ही मेहनतीने तयार केलेल्या स्वयंपाकात भुसा आणि गाढवाची लीद असू शकते. हो तुम्हाला हे खोटं वाटत असलं तरी हे खरं आहे. स्वयंपाकाचा आत्मा म्हणजे जो मसाला तुम्ही स्वयंपाकासाठी वापरता त्या मसाल्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं समोर आले आहे. मिरची पावडरमध्ये लाकडाचा भुसा टाकला जातो. तर गरम मसाल्यात गाढवाची लीद मिसळली जाते.
हळदीत शेण आणि भुसा मिसळला जातो. भेसळ करताना कृत्रिम रंग आणि रसायनांचाही तडका दिला जातो. भेसळयुक्त मसाले आकर्षक पॅकिंग करुन बाजारात विकले जातात. अशाच एका फॅक्ट्रीचा यूपी एफडीएने भांडाफोड केला.
तुमच्या जेवणात जो मसाला तुम्ही वापरता तो ब्रँडेड असला तरी तो अस्सल आहे का याची खात्री करा. भेसळयुक्त मसाल्याचं जेवण तुमच्या आरोग्याला घातक आहे. भेसळयुक्त मसाल्याचा स्वयंपाकामुळं प्रसंगी तुमच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.