Best Time To Drink Lemon Water : लिंबू पाण्यात अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढण्यास मदत होते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे पचनाच्या समस्या सगळ्या दूर होतात. जसे की, अपचन, गॅस, ऍसिडीटी आणि बद्धकोष्ठता देखील. एवढंच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी फायदेशीर ठरते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि शरीरातील संपूर्ण घाण साफ होते. अनेक लोक निरोगी राहण्यासाठी लिंबू पाणी पितात.
लिंबू पाणी तसे तर कोणत्याही वेळी पिऊ शकता मात्र सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने अधिक फायदे होतात. लिंबू पाणी प्यायल्यामळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते आणि वेट लॉस होण्यास मदत होते. या पेयाने दिवसाची सुरूवात करणे अतिशय चांगले असते. जर तुम्ही चहा कॉफीने दिवसाची सुरूवात करत असाल तर ती शरीरासाठी घातक आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक असतो. जास्त लिंबू पाणी प्यायल्याने दातांचे नुकसान होते. रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार सायट्रिक ऍसिडचे प्रमाण दातासाठी घातक असते. लिंबू आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्रास होतो. तसेच लिंबू पाणी कोमट असावे. ते अती गरम असल्यास शरीराला खास करून दाताला त्रास होऊ शकतो. एवढंच नव्हे तर लिंबूचा रस थेट पिऊ नये. तो पाण्यात मिक्स करूनच प्यावे.