बेडवर झोपूनंही तुम्ही करू शकता 'या' एक्सरसाइज; जाणून घ्या

जाणून घेऊया झोपून करता येणाऱ्या एक्सरसाइज

Updated: Apr 21, 2022, 08:06 AM IST
बेडवर झोपूनंही तुम्ही करू शकता 'या' एक्सरसाइज; जाणून घ्या title=

मुंबई : एक्सरसाइज करणं हे निरोगी आरोग्यासाठी फार उपयुक्त असतं. मात्र अनेकदा आपल्याला सकाळी उठून एक्सरसाइज करण्याचा फार कंटाळा येतो. यामुळे नियमित व्यायाम करण्यात खंड पडतो. मात्र असं होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला खास उपाय सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला अशा काही एक्सरसाइज सांगणार आहोत, ज्या तुम्ही बेडवर झोपूनही करू शकता.

जाणून घेऊया झोपून करता येणाऱ्या एक्सरसाइज

स्ट्रेट-लेग लोअरिंग (Straight-Leg Lowering)

  • स्ट्रेट-लेग लोअरिंग एक्सरसाइज करण्यासाठी प्रथम तुम्हाला पाठीवर झोपावं लागेल. 
  • हात सरळ ठेवा आणि पाय हिप्सच्या सरळ वर घ्या
  • पहिल्यांदा एक पाय सरळ ठेवा आणि दुसरा पाय हळू हळू खाली आणा आणि दुसरा पाय वर येईपर्यंत असं करा.
  • हे करत असताना पाठ जमिनीला चिटकून राहणं गरजेचं आहे.

सुपाइन ट्विस्ट (Supine Twist)

  • सुपाइन ट्विस्ट एक्‍सरसाइज करण्यासाठी पाठीवर झोपा.
  • यानंतर तुमचे हात पंखाप्रमाणे पसरवा. यावेळी तुमच्या शरीराचा आकार इंग्रजीतील टी अक्षराप्रमाणे दिसेल. 
  • आता तुमच्या डावा पाय गुडघ्यात दुमडा आणि वर उचला. यानंतर श्वास सोडा आणि कंबर उचलून पाठ डावीकडे वळवा.
  • तर तुमच्या डोक्याची स्थिती उलट बाजूला फिरवा
  • या पोझिशनमध्ये 10 वेळा दिर्घ श्वास घ्या

नी टू चेस्ट स्ट्रेच (Knee To Chest Stretch)

  • प्रथम सरळ झोपा त्यानंतर एक  पाय गुडघ्यातून वाकवून आणि छातीजवळ आणा.
  • 20 सेकंद या स्थितीत रहा.
  • आता जुन्या स्थितीत परत या आणि दुसऱ्या पायाने तेच करा.