Diwali 2022 HAIR LOSS TIPS: केस गळणे ही आजकाल एक सर्वसामान्य समस्या झालीये. बाजारात अनेक प्रकारची ऑइल,सिरम ,शाम्पू आहेत पण ते कितपत काम करतात हे आपण सांगू शकत नाही. हेअर फॉल (hair fall shampoo) थांबण्यासाठी आपण सगळेच खूप प्रयत्न करतो प्रत्येकजण केस गळणे टाळण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी उपाय शोधतो. पण उपाय शोधण्या आधी त्याच कारण शोधणं खूप महत्वाचं आहे. (Best hair fall control oil for female hair care tips )
केस गळण्याची अनेक कारणं (reason for hair fall)
ज्यामध्ये खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, केसांची नीट स्वच्छता न करणे ही कारणं महत्वाची आहेत.
केसगळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी केसांना तेल लावणं महत्वाच आहे.आठवड्यातून तीन वेळा कमीत कमी केसांना भरपूर तेल लावेल गेलं पाहिजे तेल लावल्याने केस मऊ होतात आणि परिणामी कमी तुटतात आणि नवीन केस देखील येतात केसांना तेलातून योग्य पोषणसुद्धा मिळत
काही अशी तेलं आहेत जे वापरून तुम्ही केसगळती रोखू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणते ऑइल वापरुन या समस्येवर मात करु शकतो. (Best hair fall control oil for female hair care tips)
रोझमेरी तेल (rosemery oil)
केस अत्यंत कमकुवत आणि मुळांपासून पातळ असल्यास. आणि ते तुटत असल्यास केसांना रोझमेरी तेल लावत जा. या तेलाच्या मदतीने केसांची वाढ होते आणि ते निरोगी राहतात. त्यामुळे केसही दाट होतात.
केसांना रोझमेरी तेल लावण्यासाठी ते खोबरेल तेलात (coconut oil) मिसळा. अर्धा चमचा खोबरेल तेलात रोझमेरी तेलाचे ५-७ थेंब मिसळा. नंतर ते स्काल्पवर लावा आणि सुमारे अर्धा तास राहू द्या. नंतर केस शाम्पूने धुवा. याचा परिणाम केसांवर लवकरच दिसून येईल.
लेमनग्रास तेल
केसांमध्ये कोंडा जास्त असेल आणि केस गळत असतील तर केसांना लेमनग्रास तेल लावा. कधी-कधी केसांमध्ये कोंड्याची समस्या देखील जास्त प्रमाणात असते त्यामुळे केस गळण्यास सुरुवीत होते . लेमनग्रास तेल स्काल्पचा कोरडेपणा दूर करते. ज्यामुळे कोंडा संपतो. कोणत्याही शैम्पूमध्ये लेमनग्रास तेलाचे 4-5 थेंब मिसळा.
चंदन तेल
केस खूप तेलकट आणि चिकट असल्यास केस गळतात, तर चंदनाचे तेल लावल्याने फायदा होऊ शकतो. हे स्काल्पवरील तेल-उत्पादक ग्रंथींचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळे केसांमधील खाज, कोंडा आणि चिकटपणापासून आराम मिळतो. ते लावण्यासाठी खोबरेल किंवा एरंडेल तेलात चंदनाच्या तेलाचे 3-4 थेंब मिसळा आणि स्काल्पवर लावा. (Best hair fall control oil for female hair care tips)
(वरील माहिती सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे Zee24 Taas याचं पुष्टीकरण करत नाही )