मुंबई: भात हा तसा हलका अहार. पण, अनेकांना या अहाराबद्धल भलतेच गैरसमज असतात. काही लोक म्हणतात भात खाल्ल्यामुळे वजन वाढते. तर, काही म्हणतात भात खाल्याने सतत सुस्ती येते. पण, प्रत्येक पदार्थांमध्ये काही ना काही प्रमाणात गुण-दोष हे राहतातच. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत भात खाण्याचे फायदे...
भातामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे त्यातून शरीराला मोठ्या प्रमाणावर उर्जा मिळते. आठवड्यातून तिन वेळा भात खाल्ल्याने शरीराला मोठा फायदा होतो.
भात हा पचायला अगदीच हलका असतो. त्यामुळे भाताच्या सेवनाने डायरिया, अपचन यांसारख्या समस्यांपासून सूटका मिळते.
मायग्रेनच्या त्रासापासून सूटका मिळविण्यासाठीही भाताचे सेवन फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी भातात मध मिसळून त्याचे सेवन केल्यास आराम मिळतो. हा उपाय साधारण एक आठवडा करावा.
दरम्यान, पोटातील जंतावरही भात प्रभावी ठरतो असे सांगतात.
भातामध्ये सोडियमची मात्रा योग्य प्रमाणात असते. त्यामुळे ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांनी भात खाल्ल्यास फायदा मिळू शकतो.