Belly Fat कमी न होण्यामागे 'या' 4 गोष्टी कारणीभूत; आजच करा उपाय!

तुमच्या पोटाची चरबी का कमी होत नाही याच्या काही संभाव्य कारणांबद्दल आज जाणून घेऊया.

Updated: Sep 29, 2022, 07:22 AM IST
Belly Fat कमी न होण्यामागे 'या' 4 गोष्टी कारणीभूत; आजच करा उपाय! title=

मुंबई : वजन कमी करण्यासोबतच, बेली फॅट कमी करणं खूप महत्वाचं आहे. बेली फॅटपासून मुक्त होणं थोडं कठीण आहे. पोटाभोवती चरबी साठणं हे जास्त कॅलरी अन्न, जास्त साखर, कार्बोहायड्रेट्स आणि पॅकेज केलेलं अन्न खाण्यामुळे होऊ शकतं. ते कमी करण्यासाठी अनेकजण खूप मेहनत घेतात, पण इतकं करूनही पोट कमी होत नाही. तुमच्या पोटाची चरबी का कमी होत नाही याच्या काही संभाव्य कारणांबद्दल आज जाणून घेऊया.

तणाव

कोणत्याही गोष्टीचा ताण तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, ताण घेतल्याने पोटाची चरबी कमी होण्यास अडचण निर्माण होते? तणावामुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल हार्मोनचा स्राव होतो. 2012 च्या अभ्यासानुसार, हे हार्मोन तुमची चयापचय मंद करू शकतं. अशा प्रकारे कमी कॅलरीज बर्न होतात आणि लठ्ठपणा वाढतो.

सतत पार्टी करणं

प्रत्येकाला पार्टी करायला आवडतं. कारण पार्टीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना भेटता आणि अनेक गोष्टी करता. पण जर तुम्ही पार्टीदरम्यान जास्त मद्यपान केलं तरी वजन वाढू शकतं

अनुवांशिक घटक

अनेक अहवालांमध्ये असं सूचित करण्यात आलंय की, तुमचे जीन्स तुमच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. म्हणून, जर तुमच्या आईला किंवा त्याच जनुक पूलच्या एखाद्याला पोटाची चरबी वाढवण्याची प्रवृत्ती असेल, तर तुम्हालाही लठ्ठपणाचा त्रास सहन करावा लागू शकतो.

चुकीचा व्यायाम

फक्त कार्डिओ व्यायामाने पोटाची चरबी कमी करणं कठीण आहे. हे कमी करण्यासाठी, तुम्ही योग्य व्यायाम केला पाहिजे. अहवालानुसार, आठवड्यातून 250 मिनिटं मध्यम व्यायाम आणि 125 मिनिटं उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यास त्वरित परिणाम दिसून येतो.