निद्रानाशाची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी 'असा' करा केळ्याचा वापर

आजकाल लाईफस्टाईलमध्ये इतके बदल झाले आहेत की त्याचा कळत नकळत आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. 

Updated: Aug 23, 2018, 10:13 AM IST
निद्रानाशाची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी 'असा' करा केळ्याचा वापर  title=

मुंबई : आजकाल लाईफस्टाईलमध्ये इतके बदल झाले आहेत की त्याचा कळत नकळत आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशामधूनच तरूणांमध्ये वाढणारी एक समस्या म्हणजे 'निद्रानाश'.  निद्रानाशाची समस्या अनेकांना क्षुल्लक वाटते. निद्रानाशेवर वेळीच उपचार न केल्यास त्यामधून अनेक आजार वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच औषधगोळ्यांऐवजी काही घरगुती उपायांनी  निद्रानाशेच्या समस्येवर उपाय करणं शक्य आहे. 

केळं फायदेशीर   

निद्रानाशेचा त्रास दूर करण्यासाठी केळं हे अत्यंत फायदेशीर आहे. केळं बारमाही उपलब्ध असल्याने त्याचा आहारात समावेश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. केळ्याच्या सेवनाने शरीराला तात्काळ उर्जा मिळते. वाफवलेलं केळं निद्रानाशाची समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत करते.  

आरोग्याला फायदेशीर 

रात्री झोप येत नसल्यास केळं खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. केळ्यातून कॅल्शियम घटक मिळतात यामुळे हाडं मजबूत होतात. 

निद्रानाशेची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी केळ्याचा सालीसकट आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे शांत झोप मिळणयस मदत मिळते. 

कसा बनवाल केळ्याचा काढा ? 

कपभर पाणी उकळा. त्यामध्ये दालचिनीची पावडर मिसळा. उकळी आल्यानंतर त्यामध्ये पिकलेल्या  केळ्याचे लहान लहान तुकडे टाका. काही वेळाने हे मिश्रण गाळून थंड करून प्या. प्रामुख्याने रात्री झोप न येणार्‍यांमध्ये हा काढा अत्यंत फायदेशीर आहे. केळ्याच्या सालीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते.