अशा 4 व्यक्तींच्या रक्तामध्ये वाढतं खराब cholesterol; आजच सावध व्हा!

हृदय निरोगी ठेवायचं असेल आणि धोकादायक आजारांपासून दूर राहायचं असेल, तर तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.

Updated: Oct 5, 2022, 06:55 AM IST
अशा 4 व्यक्तींच्या रक्तामध्ये वाढतं खराब cholesterol; आजच सावध व्हा! title=

मुंबई : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतं. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे रक्त पेशींमध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हृदयाला होणारा रक्तप्रवाह खूप कमी होतो किंवा थांबतो. हृदय निरोगी ठेवायचं असेल आणि धोकादायक आजारांपासून दूर राहायचं असेल, तर तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.

कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असून रक्ताच्या नसांमध्ये आढळतो. कोलेस्ट्रॉल तुमच्या यकृतामध्ये तयार होतं परंतु काहीवेळा ते तुम्ही खाल्लेल्या अन्नामुळे देखील तयार होते. त्यामुळे जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी राखणं गरजेचं आहे.

या कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या मते, अनेक रोग, तुमची जीवनशैली, कौटुंबिक इतिहास यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका लक्षणीय वाढतो. मात्र, काही गोष्टींवर नियंत्रण ठेवून तुम्ही कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करू शकता.

सॅच्युरेटेड फॅटमुळे वाढतं कोलेस्ट्रॉल 

सीडीसीच्या मताप्रमाणे, जे लोक सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट असलेले पदार्थ खातात, त्यांना कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचा धोका जास्त असतो. तूप, लोणी, केक, मांस, बिस्किट, चीज इत्यादी अनेक गोष्टींमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचा समावेश होतो. या सर्व गोष्टींमुळे हृदयविकाराचा धोका खूप वाढतो.

व्यायाम न करणाऱ्या व्यक्ती

जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी तुम्ही दररोज 20 मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. जर तुम्ही व्यायाम करत नसाल किंवा कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचाली करत नसाल तर तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं. 

धूम्रपान करणाऱ्यांना धोका 

धुम्रपानामुळे तुमच्या रक्तपेशी खराब होऊ लागतात आणि त्यामध्ये चरबी जमा होऊ लागते. धूम्रपानामुळे शरीरात चांगलं कोलेस्ट्रॉलही कमी होऊ लागतं.

वय हे देखील एक कारण

वयानुसार कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढतो. जसजसं तुमचं वय वाढतं त्यानुसार तुमचं शरीर रक्तातून कोलेस्ट्रॉल वेगळं करू शकत नाही.