कॅनबेरा : चीनच्या अनेक लॅबवर कोरोना व्हायरसची निर्मिती केल्याचे आरोप आहेत. तर काही असे लॅब देखील आहेत जे लोकांना जीवनदान देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या जगातील सर्वच देश कोरोनाचा सामना करत आहे. शिवाय जगभरातील वैज्ञानिक संशोधक कोरोनावर लस काढण्याच्या प्रयत्नात आहेत. वैज्ञानिक आणि संशोधक लवकरात लवकर कोरोनावर लस शोधून काढतील अशी अपेक्षा जगातील प्रत्येक नागरिक करत आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून एक आनंदाची बातमी येत आहे.
ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी लसीचा शोध लावला आहे. या लसीवर सध्या चाचणी सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ साइंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गेनायझेशनने (CSIRO) दोन वेग-वेगळ्या प्रकारच्या लसींवर चाचणी करण्यास सुरवात केली आहे. ही चाचणी सर्वप्रथम प्रण्यांवर करण्यात येणार आहे. एका लसीची चाचणी इंजेक्शनद्वारे तर दुसरी चाचणी नेजल स्प्रेद्वारे करण्यात येणार आहे.
या दोन लसींची चाचणी प्रण्यांवर केल्यानंतर ऑस्ट्रेलिया ही चाणणी कोरोना रुग्णांवर देखील करणार आहे. कोरोना लसीच्या चाचणीत सामील असलेल्या ऑस्ट्रेलियन अॅनिमल हेल्थ लॅबोरेटरी (एएएचएल) चे संचालक प्रोफेसर ट्रेवर ड्यू यांच्या म्हणण्यानुसार, या चाचणीला चांगले निकाल मिळत आहेत.
शिवाय, या लसीचा रुग्णांच्या आरोग्यावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होऊ नये याची देखील काळजी वैज्ञनिक घेत आहेत. त्यामुळे आता लवकरच कोरोनावरील लस येवू शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रत्येक देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाटयाने वाढत आहे.