तब्बल 108 किलो वजन कमी करुन फिट झालेले अनंत अंबानी, 'या' कारणांमुळे पुन्हा वाढलं वजन

Anant Ambani Weight : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांच्या प्री वेडिंग इव्हेंटची जोरदार चर्चा रंगली आहे. या दरम्यान पुन्हा एकदा अनंत अंबानी यांच्या वजन वाढीमागचं कारण का? असा प्रश्न विचारला जात आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 29, 2024, 03:44 PM IST
तब्बल 108 किलो वजन कमी करुन फिट झालेले अनंत अंबानी, 'या' कारणांमुळे पुन्हा वाढलं वजन title=

Anant Ambani Health Issue : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग इव्हेंटची सगळीकडे चर्चा आहे. यावेळी अनंत अंबानी यांनी पहिल्यांदाच आपल्या आरोग्याच्या समस्यांबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे. 108 किलो वजन कमी केलेल्या अनंत अंबानी यांचं पुन्हा वजन वाढण्यामागचं कारण काय? 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचं अनंत अंबानी यांचे लग्नाच्या प्री वेडिंग सेरेमनीला सुरुवात झाली आहे. अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंट यांच्यासोबत होणार आहे. साखरपुड्यानंतर या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय होते. या दरम्यान अनंत अंबानी यांच्या दोन फोटोंची चर्चा जास्त होत आहे ज्यामध्ये अनंत अंबानी यांचं वजन अतिशय वाढलं होतं. आणि दुसऱ्या फोटोत त्यांनी तब्बल 108 किलो वजन कमी केले होते. 

या कारणामुळे वाढले वजन?

अनंत अंबानी यांची आई नीता अंबानी यांनी 2017 मध्ये एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या मुलाला दम्याचा गंभीर त्रास आहे. त्यामुळे त्यांना खूप स्टिरॉइड्सवर ठेवावे लागले. परिणामी अनंतचे वजन पुन्हा वाढले. 

दम्याच्या उपचारात स्टेरॉईड औषधांचा वापर श्वसनाच्या नळ्या उघडण्यास मदत करतात. ज्यामुळे श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. त्याचे दुष्परिणाम देखील होतात ज्यामध्ये वजन भरपूर प्रमाणात वाढते. स्टेरॉईडच्या दीर्घकालीन वापरामुळे काही लोकांमध्ये वजन वाढू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्टेरॉइड औषधांच्या वापरामुळे चयापचय गती कमी होते ज्यामुळे अन्न लवकर पचत नाही आणि वजन वाढते.

असा होता अनंत अंबानी यांचा डाएट प्लान?

2016 मध्ये अनंत अंबानी यांनी अवघ्या दीड वर्षात 108 किलो वजन कमी केले. रिपोर्ट्सनुसार, वजन कमी करण्यासाठी ते पाच ते सहा तास वर्कआउट करत असून 21 किलोमीटर चालत असे. योगासने हा देखील त्यांच्या दिनचर्येचा एक भाग होता. सोबतच वजन कमी करण्यासाठी प्रशिक्षण फंक्शनल ट्रेनिंग आणि कार्डिओ करायचे. अनंत यांनी वजन कमी करण्यासाठी झिरो-सेव्हर, हाय-प्रोटीन आणि लो-फॅट लो-कार्ब आहाराचे पालन केले. दररोज तो 1200 ते 1400 कॅलरीज घेत असतं. याशिवाय त्यांनी आपल्या आहारात हिरव्या भाज्या, कडधान्ये, मोड आलेले धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ, चीज आणि दूध यांचाही समावेश केला. यासोबतच त्यांनी त्या काळात जंक फूडही टाळले.

स्टेरॉइड म्हणजे काय?

 सोप्या भाषेत सांगायचे असेल तर, स्टेरॉइड हा एक प्रकारचा हार्मोन आहे जो शरीरात तयार होतो. परंतु आपण बाहेरून जे स्टेरॉइड्स वापरतो ते नैसर्गिक संप्रेरकांचे कृत्रिम रूप असतात. स्टेरॉइड्स स्नायूंच्या वाढीस मदत करतात आणि दम्यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. हे गोळ्या, सिरप आणि द्रव स्वरूपात बाजारात उपलब्ध आहेत.