मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे कमी बजेट असलेल्या या सायकल प्रेमींना अगदी कमी किंमतीत सायकल कशी खरेदी करता येईल ते जाणून घेऊय़ात.
Hero Sprint ची बाईक जगात सर्वाधिक विकली जाते.या सायकलची किंमत 6,999 रुपये आहे. परंतु अॅमेझॉन डीलमध्ये 21% ची सूट आहे. त्यामुळे तुम्ही फक्त 5,199 रुपयांमध्ये ही सायकल खरेदी करू शकता. ही एक 18 इंचाची सिंगल गीअर सायकल आहे. यात अँटी स्किड पेडल्स आहेत.
Omobikes या लाइटवेट सायकलवर 37% सूट चालू आहे ज्याची किंमत 14,917 रुपये आहे. परंतु ऑफर 9,399 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. स्टील फ्रेममध्ये बनवलेली ही सायकल आहे, ज्याच्या फ्रेमचा आकार 18 इंच आहे. यात सिंगल स्पीड गियर देखील आहेत. या सायकलची सीट 5.2 ते 6 फूट सायकलस्वारांनुसार सेट केली जाऊ शकते. यात मडगर्ड तसेच उच्च दर्जाचे रोड बाईक टायर मिळतात.
Vesco या सायकलची किंमत 8,979 रुपये आहे. परंतु ऑफरमध्ये 27% सूट मिळत आहे, त्यानंतर तुम्ही ती 6,599 रुपयांना खरेदी करू शकता. हे सेमी असेम्बल सायकल आहे. ही एक सिंगल स्पीड सायकल आहे ज्यामध्ये मडगार्ड बसवले आहेत. समोर आणि मागील रिफ्लेक्टर बसवले आहेत.
VECTOR 91 या सायकलची किंमत 7,999 रुपये आहे. हे 26T उंचीचे अतिशय हलके सायकल आहे. 5.2 ते 5.8 फूट उंचीची व्यक्ती त्यावर स्वार होऊ शकते. ही सायकल जास्तीत जास्त 100 किलो वजन सहन करू शकते. सायकलची सीट देखील खूप प्रीमियम दर्जाची आहे आणि ती अॅड़जस्टेबल आहे. त्याची रिम रस्टफ्री स्टेनलेस स्टीलची बनलेली आहे.
(अॅमेझॉनच्या वेबसाइटवरूनच सर्व माहिती घेण्यात आली आहे. झी 24 तास येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.)