लग्नानंतर 'या' चुका करु नका नाहीतर पती पत्नीच्या नात्यात येईल दुरावा

चला जाणून घेऊया काही महिला फसवणूक का करतात. 

Updated: Oct 7, 2022, 10:05 PM IST
लग्नानंतर 'या' चुका करु नका नाहीतर पती पत्नीच्या नात्यात येईल दुरावा  title=
After marriage wives cheat on their husbands for this reason nz

Relationships Tips : अनेकदा पुरुषांना फसवणूक करणारे मानले जाते पण तसे नाही. फसवणूक करण्यात काही महिलाही पुरुषांपेक्षा कमी नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये महिला पतीची फसवणूक करतात. मात्र, यामागे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे महिला असे पाऊल उचलतात. सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी नात्यात प्रेम असणं खूप गरजेचं आहे, पण नात्यातील प्रेम आणि आपुलकी संपली की लोक फसवणूक करायला लागतात. चला जाणून घेऊया काही महिला फसवणूक का करतात. (After marriage wives cheat on their husbands for this reason nz)

1. प्रेम न मिळणे- 
पत्नीच्या फसवणुकीचे मुख्य कारण म्हणजे पतीकडून प्रेम न मिळणे. लग्नाच्या काही वर्षांपर्यंत लोक त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम करतात. पण जसजसा वेळ जातो तसतसे तो आपल्या पत्नीवर प्रेम करणे थांबवतात किंवा कामात अधिक व्यस्त होतात. प्रेम मिळालं नाही की बायकोचा कल दुसरीकडे सुरू होतो.

आणखी वाचा - पुरुषांना आवडतात 'या' 5 प्रकारच्या महिला...अशा महिलांसोबत आयुष्य...

2. जवळीक नसेल तर - 
नात्यात जवळीक नसल्यामुळेही पत्नी पतीची फसवणूक करते. पती-पत्नीच्या नात्यात भावनिक जोडण्यासोबतच शारीरिक जवळीकही आवश्यक असते. अशा परिस्थितीत जेव्हा त्याची कमतरता जाणवते तेव्हा पत्नीला इतर पुरुषांमध्ये रस निर्माण होण्याची शक्यता वाढते.

3. दररोज भांडण होत असेल तर - 
जेव्हा पती पत्नीशी रोज भांडतो तेव्हा या गोष्टीमुळे पत्नी नाराज होते. त्यामुळे दोघांमधील प्रेम संपते आणि अंतर वाढते. असे झाल्यावर पत्नी कुठेतरी प्रेम शोधू लागते आणि पतीला फसवते.

4. दुर्लक्ष केल्यावर - 
जेव्हा पती आपल्या पत्नीकडे लक्ष देत नाही आणि तिच्याकडे दुर्लक्ष करतो, खूप प्रयत्न करूनही पत्नीची कधीच कौतूक करत नाही, तेव्हा पत्नीला असे वाटते की आपण तिच्यासाठी काहीही बोलत नाही. जेव्हा नवरा तिच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा बायकोला खूप वाईट वाटते, म्हणून ती नवऱ्याची फसवणूक करु शकते.

आणखी वाचा - Entertainment चा तडका, OTT वर गाजलेल्या 'या' मालिकेचा तिसरा सीझन येतोय

5. आर्थिक समस्यांमुळे त्रस्त- 
कधी-कधी असे घडते की आर्थिक समस्येनला कंटाळूनही पत्नी पतीची फसवणूक करते. लग्न झाल्यावर जेव्हा पतीला पत्नीच्या गरजा कशा पूर्ण करायच्या हेच कळत नाही, तेव्हा तिला छोट्या छोट्या गोष्टींची आस लागते. अशा परिस्थितीत ती अशा पुरुषाचा शोध घेते जो तिच्या ईच्छा पूर्ण करु शकेल. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)