Tips To Beat Post-Festival Blues : उत्सव म्हटला की आनंद, नातेवाईक आणि रोजच्या जीवनातून वेगवेगळं... नुकतीच आपण सगळ्यांनी मोठ्या उत्साहात दिवाळीचा (Diwali) सण साजरा केला. कोरोनाच्या महासंकटानंतर दोन वर्षांनी मोठ्या जल्लोषात तुम्ही आम्ही सगळ्यांनी दिवाळीचा पुरेपूर आनंद लुटला. दिवाळी म्हटलं की चहूबाजूला रोशनाई, कंदील, रांगोळी आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. नातेवाईक, मित्र परिवार एक हा दिवाळीचा सण साजरा करतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून चार क्षण निवांत आणि आनंदाचे कोणाला नको असतात. पण जेव्हा हे क्षण संपतात त्यानंतर अनेकांना दुसऱ्या दिवशी थकवा, नैराश्य आणि उदासपणा जाणवतो. हे असं वाटणं सहज नसून याला Post-Festival Blues असं म्हटलं जातं.
'द पोस्ट फेस्टिव्हल ब्लूज' म्हणजे उत्सवानंतर दुःखाची भावना निर्माण होणे. ही भावना निर्माण होणे हे पूर्णपणे सामान्य आहे. आनंद, रंग आणि नातेवाईकांची किंवा मित्रपरिवारांनी वेढलेला आठवड्या शेवटी संपतो तेव्हा आपल्याला तीव्र दुःखासारखे वाटतं. अनेकांना पोस्ट फेस्टिव्हल ब्लूज ची समस्या जाणवते. त्याशिवाय जेव्हा आपण रोजच्या जीवनातून काही दिवसांसाठी निर्सगाच्या सान्निध्यात रमतो आणि परत घराकडे येतो तेव्हा आपल्याला हॉलिडे ब्लूज (Holiday Blues) ही समस्या जाणवते. कारण घरात परत आपण आपलं रोजचं रुटीन सकाळी उठा तोच नाश्ता डबा ऑफिसची घाई, प्रवास आणि मग ऑफिसमधील कामाचा ताण...हे एक दिवस नाही तर रोजची जीवनशैली असते. त्यामुळे या सगळ्यांची अनेकांना भीती वाटते त्यातून पोस्ट फेस्टिव्हल ब्लूज आणि हॉलिडे ब्लूजची समस्या जाणवते. (After Diwali 2022 post festival blues and Holiday Blues tips nmp)
निरोगी काहीतरी खा, कॅफिन आणि अल्कोहोल टाळा
तुमचे जीवनसत्त्वे आणि पूरक आहार घ्या
आराम करा, स्वतःवर कठोर होऊ नका
काहीतरी मजेदार आणि सर्जनशील करा
काही चांगले संगीत ऐका
श्वासोच्छवासाचे व्यायाम उपयुक्त ठरू शकतात
एखाद्यासाठी काहीतरी चांगले करा
वर्कआउट सुरु करा
आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या
मेडेटिशन करा
सोशल मीडियापासून काही दिवस दूर जा