झटक्यात 'गोरं' करणाऱ्या कंपन्यांचा 'काळा'बाजार उघड

एफडीएनं ब्युटी प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केलीय. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय अशा सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. अशा सौंदर्य प्रसाधनांमध्ये स्टेरॉईडची अतिरिक्त मात्रा वापरली जाते. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.

Updated: Jun 6, 2017, 06:21 PM IST
झटक्यात 'गोरं' करणाऱ्या कंपन्यांचा 'काळा'बाजार उघड title=

मुंबई : एफडीएनं ब्युटी प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केलीय. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय अशा सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. अशा सौंदर्य प्रसाधनांमध्ये स्टेरॉईडची अतिरिक्त मात्रा वापरली जाते. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.

केवळ सात दिवसांमध्ये तुमचा रंग उजळून जाईल... तुम्ही गोरे व्हाल... अशा जाहिरातींना ग्राहक बळी पडू नयेत यासाठी अशा कंपन्यांना चांगलाच दणका बसणार आहे. कंपन्या आपलं प्रोडक्टचा जितका प्रचार करतात तितका त्या प्रोडक्टमध्ये हाइड्रोक्योनोन आणि मोमेटेसोन यांसारखे स्टेराईड असतात. हे स्टेरॉईड तुमच्या त्वचेवरील एक थर काढून टाकतात... त्यामुळे डॉक्टरांच्या परवानगीशीवाय बाजारात विकल्या जाणाऱ्या अशा प्रोडक्टवर निर्बंध लादण्यास एफडीएनं सुरुवात केलीय, अशी माहिती एफडीए कमिशनर डॉ. हर्षद पाटील यांनी दिलीय.

स्टेरॉईडचा शरीरावार परिमाण

- त्वचा गोरी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्रीममध्ये केवळ 0.2 पासून 0.5 मिली ग्राम हाइड्रोक्योनोन और मोमेटेसोनचं प्रमाण असावं लागतं.

- मात्र त्वरीत परिणाम दिसण्यासाठी चक्क 20 मिली ग्रॅमपर्यंत स्टेरॉई़़ड यात मिसळले जातात..

- सर्वसामान्य ग्राहक याकडे सर्रास दुर्लक्ष करतो... आणि त्यामुळे अशा ग्राहकांना दुर्धर आजारांना तोंड द्यावं लागतं.

स्वताचं म्हणणं खरं करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. मात्र, एफडीएनं अशा कंपन्यांना नोटीस पाठवून उत्तर मागितलंय.