आंब्यासोबत चुकूनही खाऊ नका हे फूड कॉम्बिनेशन, पोटात तयार होईल भयंकर गॅस

'या' 5 फूड कॉम्बिनेशनमुळे पोटात तयार होतो जीवघेणा गॅस, कधीच एकत्र खाऊ नका

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 15, 2024, 06:30 PM IST
आंब्यासोबत चुकूनही खाऊ नका हे फूड कॉम्बिनेशन, पोटात तयार होईल भयंकर गॅस title=

अनेक पदार्थ आपण एकत्रितपणे कॉमबिनेशनमध्ये खाणं पसंत करतो. पण तुम्हाला माहित आहे का? या 5 फूड कॉम्बिनेशनने पोटात तयार होतो भयंकर गॅस. त्यामुळे आंब्यासोबत काय खायचे हे वाचून घ्या. पोटात गॅस तयार होणे ही अतिशय सामान्य बाब आहे. पण पोटातील गॅसला आहारातील काही पदार्थही कारणीभूत ठरतात. अशावेळी तुम्ही कोणत्या पदार्थासोबत काय खाता हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. असेच 5 फूड कॉम्बिनेशन पदार्थ आहेत जे शरीरासाठी अतिशय खासत आहेत. 

स्टार्च आणि फळे 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, फळांसोबत बटाटे, तारो आणि तांदूळ यासारखे पिष्टमय पदार्थ खाऊ नका. पोटात गॅस तयार होण्याची शक्यता वाढते. कारण फळे लवकर पचतात, पण फळांपेक्षा स्टार्च पचायला थोडा जास्त वेळ लागतो. पण दोन्ही एकत्र खाल्ल्याने फळ लवकर पचत नाही; त्यामुळे हे दोन्ही एकत्र खाणे टाळावे.

दूध आणि ब्रेड 

बऱ्याचदा आपण नाश्त्यात दुधासोबत ब्रेड खातो, हे चुकीचे संयोजन आहे. दूध आपल्या आरोग्यासाठी आणि हाडांसाठी खूप फायदेशीर आहे, पण ते ब्रेडसोबत घेणे योग्य नाही. ब्रेडमध्ये असलेले यीस्ट दुधासोबत मिसळून गॅस तयार होतो.

कॉर्नफ्लेक्स आणि ज्यूस 

बरेच लोक नाश्त्यात कॉर्नफ्लेक्स खातात, पण त्यासोबत ज्यूसही घेतात. या दोघांना सोबत घेणे योग्य नाही. धान्यांमध्ये असलेले कार्बोहायड्रेट आणि फळांच्या रसांचे मिश्रण पोटातील एन्झाईम्सची क्रिया मंदावते, ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो.

प्रोटीन आणि शुगर 

उच्च प्रथिने आणि साखर एकत्र घेऊ नका. विशेषत: कोणत्याही प्रकारच्या प्रोटीन शेकसह. कारण साखर प्रथिने पचवण्याचा प्रयत्न करते, परंतु प्रथिनांमध्ये असलेल्या एन्झाईममुळे पोटात उलट प्रतिक्रिया होऊ शकते.

नट्स आणि ऑलिव ऑयल 

काजू आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र खाऊ नका. ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे फॅट आणि नटांमध्ये आढळणारे प्रथिने दोन्ही हळूहळू पचतात, ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे नटांसह ऑलिव्ह ऑईल खाऊ नका.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)