Chilled Water Disadvantages: उन्हाळ्यात (Summer) पचन संस्था कमी होते. अशावेळी लिक्विड फूड (Liquid Food) खाण्याकडे लोकांचा ओढा जास्त असतो. ज्यूस, नारळपाणी सारखे विविध पेये जास्त प्यायले जातात. तसंच, शरीरातून जास्त घाम जात असेल तर पाण्याचे सेवनही जास्त होते. तज्ज्ञांच्या मते दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी प्यायला हवे. गरमीच्या दिवसात बाहेरुन आल्यानंतर तहान भागवण्यासाठी सर्रास फ्रीजमधील बाटली काढून थंड पाणी पितात. थंड पाणी प्यायल्याने उन्हातून आल्याचा त्रास थोडा कमी झाल्याचे जाणवते. पण पाण्याच्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होत असतो. उन्हाळ्यात थंड, गार पाणी प्यावेसे वाटते म्हणऊन लोक फ्रीजचे पाणी पितात. पण फ्रीजचे थंड पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. (Side Effects Of Drinking Chilled Water)
फ्रीजचे थंड पाणी पिण्यामुळं अनेक आजारांना आमंत्रण मिळते. थंड पाण्यामुळं शरीर असंतुलित होते. ज्याचा थेट परिणाम पाचनक्रियेवर पडतो आण पचनसंस्था मंदावते. तसंच, थंड पाणी पिण्याचे अन्यही दुष्परिणाम आहेत. थंड पाणी प्यायल्याने अॅसिटीडी होऊ शकते. जास्त प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने पाचनक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळं जेवण पचत नाही. पचनसंस्था मंदावल्याने बद्धकोष्ठासोबतच पोटदुखी आणि अॅसिटीडीसारखी समस्या निर्माण होते.
उन्हातून आल्यावर लगेचच थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्यास ब्रेन फ्रीझ होऊ शकतो. तसंच, तुमच्या मणक्यातील अनेक नसांवरही त्याचा परिणाम होतो. ज्यामुळं मेंदूवर परिणाम होऊन डोकेदुखी होऊ शकते. ज्या लोकांना सायनसचा त्रास आहे त्यांनी अधिक थंड पाणी पिणे टाळावे.
थंड पाणी प्यायल्याने हार्ट रेट कमी होण्याची भीती असते. कारण वेगस मज्जातंतूवर त्याचा थेट परिणाम होतो. पाण्याचे तापमान कमी असल्याने वेगस मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळं हृदय गतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
थंड पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट बर्न होत नाही याउलट फॅट अधिक वाढते. त्यामुळं वजन वाढते. म्हणूनच जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर थंड पाणी पिणे टाळा.
थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवतो. जेवणानंतर थंडपाणी प्यायल्यास श्लेष्मा तयार होण्याची भिती असते आणि त्यामुळं श्वसनाचा मार्ग बंद होतो. त्यामुळंच घसा खवखवतो. त्याचबरोबर सर्दी, घशाला सूज येणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.