मुंबई : प्रत्येकवर्षी डेंग्यूमुळे अनेकांचा जीव जातो. यामुळे डेंग्यूबाबतीत सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. डेंग्यु हा ताप मच्छरांनी कापल्यामुळे होत असतो. हा संक्रमण एडीज मच्छर चावल्यामुळे होतो. डेंग्युच्या या आजारात त्या व्यक्तीला भरपूर ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टे उटतात, डोकं दुखी, अंग दुखी, सांधेवात, भूक कमी लागणं, सतत उल्टी होणे यासारखे प्रकार होतात.
रात्री देखील लाईटच्या प्रकाशात मच्छर चावतात
डेंग्यूची मच्छर दिवसा उजेडी चालते. त्याचप्रमाणे खास गोष्ट ही आहे की, रात्री लाइटच्या प्रकाशात देखील मच्छर चावण्याची दाट शक्यता आहे. हे मच्छर खासकरून सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्त होताना चावतात. मच्छरची चावण्याची सर्वात आवडती जागा हाताच्या कोन्याच्या खाली, गुडघ्यांवर चावतात. सर्वात जास्त डेंग्यूचा त्रास हा जुलै ते ऑक्टोबर महिन्यात होतो.
श्वेत रक्त धमण्यांवर आक्रमण
डेंग्यू मच्छर एकाचवेळी 100 हून अधिक अंडी घालतो. यांच जीवन जवळपास 2 आठवड्यांच असतं. डेंग्यू मच्छरांनी सोडलेला वायरल हा व्यक्तीच्या सरळ शरीरात घुसून रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. कमी लोकांना माहित असेल की, एडिस मच्छरच्या चावण्यामुळे ती व्यक्ती सरळ मृत्यूपर्यंत पोहचू शकते.
घरातील टाक्या
एका रिपोर्टमध्ये खुलासा केला आहे की, 41% मच्छर हे प्लास्टिकचे ड्रम आणि कंटेनरमध्ये निर्माण होतात. तसेच घरात अतिरिक्त पाण्याचा साठा. कुलरांमध्ये 12टक्के आणि लोखंडाच्या कंटेनरमध्ये 17 टक्के मच्छर निर्माण होतात.
प्लेटलेट्समुळे होत नाही मृत्यू
कायम असं सांगितलं जातं की, प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे लोकांचा मृत्यू झाला. खूप कमी लोकांना माहित आहे की, डेंग्यू दरम्यान मृत्यू होतो त्याच कारण कॅपिलरी लीकेजमुळो होते. जर कुणाला कॅपिलरी लीकेजचा त्रास सुरू झाला तर त्या व्यक्तीला पातळ आहार द्यावा.