बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंत झुबेरची सलमानविरोधात तक्रार

 झुबेरने सलमानविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 9, 2017, 10:39 AM IST
 बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंत झुबेरची सलमानविरोधात तक्रार title=

नवी दिल्ली : बिग बॉस ११ चा सिझन पहिल्या दिवसांपासूनच चर्चेत आहे. शो च्या सुरूवातीपासूनच स्पर्धकांमध्ये सुरू झालेली लढाई थांबण्याची चिन्हे दिसत नाहीएत. कोणीना कोणी भांडणातून चर्चेत असतोच पण या संपूर्ण आठवड्यात झुबेर खान या चर्चेत अग्रस्थानी होता. शनिवारी विकेंडच्या दिवशी सलमानने घरातील मंडळींशी चर्चा केली तेव्हा झुबेरवर त्याचा राग निघाला. सलमानने एवढे सुनावल्यानंतर झुबेरने झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. यानंतर त्याला हॉस्पीटलला पाठविण्यात आले. 

यानंतर झुबेरने सलमानविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे.

FIR, Zubair Khan शोचा संचालक सलमान खानने मला कुत्रा बनविण्याची धमकी दिली. तु बाहेर ये, मी तुला सोडणार नाही असेही सलमान म्हणाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.कोणीतरी बिग बॉसच्या घरात आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या दिवशी अक्षय ददलानीला धक्का दिल्याप्रकरणी प्रियांक शर्माला सलमानने घरातून बाहेर काढले. सगळ्यांनी घरात चांगली वागणूक करावी असेही सलमाननने सांगितले आहे.