'लिव्ह-इनमध्ये राहणं पाप, पण लग्नाच्या आधी गरजेचं...', झीनत अमान यांचा तरुणांना सल्ला

Zeenat Aman Advice Young Couples To Live In Together : झीनत अमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तरुणांना लग्नाच्या आधी लिव्ह-इन म्ध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. नक्की काय कारण आहे जाणून घ्या...

दिक्षा पाटील | Updated: Apr 10, 2024, 03:13 PM IST
'लिव्ह-इनमध्ये राहणं पाप, पण लग्नाच्या आधी गरजेचं...', झीनत अमान यांचा तरुणांना सल्ला title=
(Photo Credit : Social Media)

Zeenat Aman Advice Young Couples To Live In Together : पाश्चिमात्य देशात एकीकडे लोक लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि त्यानंतर लग्न बंधनात अडकतात. तर दुसरीकडे भारतात लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे किंवा एकतर चुकीच्या नजरेनं पाहिलं जातं. मात्र, बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांचं म्हणणं आहे की आजकालच्या मुलांनी लग्नाच्या आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायला हवे. त्यांनी हा देखील खुलासा केला की त्यांची मुलं देखील लग्नाच्या आधी लिव्ह इनमध्ये राहत होते. असं करण्याची काय गरज आहे आणि त्यानं काय फायदा होणार हे झीनत अमाननं सांगितलं आहे. 

खरंचर झीनत अमान यांच्याकडे एका चाहत्यानं रिलेशनशिपला घेऊन एक सल्ला मागितला. त्यावर उत्तर देत झीनत अमान यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावेळी त्यानी त्यांची श्वान लिलीचा फोटो शेअर केला आहे. यात झीनत अमान यांनी लिव्ह इनमध्ये राहिल्यानं कपल्समध्ये त्यांच्यात होणारी छोटी-मोठी भांडणं कशी सोडवण्याची याविषयी कळू लागतं. ते एकमेकांना समजून घेऊ लागतात. झीनत अमान यांनी सांगितलं की "तुमच्यापैकी कोणी माझ्या मागच्या पोस्टमध्ये कमेंट करत रिलेशनशिपवर सल्ला मागितला होता. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर माझा एकच सल्ला आहे की लग्नाच्या आधी लिव्ह इनमध्ये रहा. मी दोन्ही मुलांना हाच सल्ला देते. सुरुवातीला लिव्ह इनमध्ये रहा." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

झीनत अमान यांनी पुढे सांगितलं की "दिवसातील काही तास तुम्ही तुमचं बेस्ट व्हर्जन होऊ शकतात, याचाच अर्थ तुम्ही तुमचा मुळ स्वभाव सोडून समोरच्या व्यक्तीला आवडेल तसं वागू शकता. पण तुम्ही बाथरुम शेअर करु शकता? त्याचा चिडलेला स्वभाव सांभाळू किंवा सहन करु शकता का? तुम्हाला जे रात्री हवंय ते खाण्यासाठी ते तयार आहेत का? बेडरुममध्ये तुम्ही एकमेकांमध्ये असलेली ती फायर टिकवून ठेवू शकता का? या सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टींवरुनच वाद किंवा भांडणं होतात. पण काय तुम्ही ही भांडण रोजच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा सामना करु शकतात का? हे लग्नाच्या आधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की तुमच्यात ताळमेळ आहे की नाही? तुम्ही कम्पॅटिबल आहात की नाही?"

झीनत अमान यांनी पुढे लिहिलं की "मला माहित आहे की भारतीय समाजात लग्नाच्या आधी एकत्र राहणं याला पाप म्हणतात. पण अनेक गोष्टी आहेत ज्यांचा समाज विरोध करतो. लोकं काय म्हणतील? पण कुटुंब आणि सरकारला मध्ये आणण्याआधी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की आधी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत तुमचं नातं फायनल टेस्ट करुन घ्या."

हेही वाचा : सलमाननं बर्थडे साँग गाताच अनंतला हसू अनावर! नेटकरी म्हणे, 'भाई काहीपण कर, पण तू...'

झीनत अमान यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी 1978 मध्ये संजय खान यांच्याशी पहिलं लग्न केलं. पण काही कारणांमुळे त्यांचं नातं तुटलं. मग झीनत यांनी 1985 मध्ये अभिनेता मजहर खानशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं असून अजान आणि जहान अशी त्यांची नावं आहेत.