झी युवा सन्मान' लवकरच झी युवावर

पुरस्काराच्या मालिकेत दहा क्षेत्रातील युवकांना सन्मानित करण्यात येणार

Updated: Nov 11, 2020, 02:00 PM IST
झी युवा सन्मान' लवकरच झी युवावर title=

मुंबई : फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत की त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत. अशा कृतिशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवाने युवा सन्मान पुरस्कारांचा तुरा खोवला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम झी युवावर शनिवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येईल.

पुरस्काराच्या मालिकेत दहा क्षेत्रातील युवकांना सन्मानित करण्यात येणार आहे. खोखोपटू सारिका काळे हिला ‘झी युवा क्रीडा सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीत आणि इतिहासातील महापुरुषांच्या विचारांना जगाच्या भाषेत नेण्याचं अद्वितीय काम करणारा योगेश मैत्रेय हा ‘साहित्य सन्मान’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या ज्योती ठाकरे यांना सामाजिक जाणीव हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
परीक्षित प्रभुदेसाई, अमित भडभडे आणि निनाद वेंगुर्लेकर यांना ‘उद्योजक सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अनेक अद्भुत शोध ज्यांनी लावले असे सुयोग बुरडकर यांची निवड ‘विज्ञान व तंत्रज्ञान सन्मान’ पुरस्कारसाठी झाली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर हिला ‘संगीत सन्मान’चा खिताब प्रदान करण्यात येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त युवा नेतृत्व हा सन्मान 'रोहित पवार', अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या कला क्ष्रेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी 'कला सन्मान', अभिनेत्री वैदेही परशुरामी हिला 'युवा तेजस्विनी चेहरा' आणि विलास शिंदे यांना बळीराजा सन्मान प्रदान करण्यात आला. याव्यक्तिरिक्त कोव्हीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता दिवस-रात्र लोकांच्या सेवेत रुजू असलेल्या महाराष्ट्र पोलीस, सरकारी इस्पितळातील डॉक्टर्स आणि नर्स, तसेच स्वच्छता कर्मचारी यांचा विशेष सन्मान या सोहळ्यात करण्यात आला.

तेव्हा हा अद्भुत सोहळा पाहायला विसरू नका शनिवार १४ नोव्हेंबर दुपारी १२ आणि संध्याकाळी ७वाजता फक्त झी युवा वर.