मुंबई : झी मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेला फार कमी वेळातच चांगली लोकप्रियता मिळू लागली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या मालिकेला आणखी एका कारणासाठी खास पसंती मिळत आहे.
हे कारण म्हणजे मालिकेतील बालकलाकार मायरा. मालिकेत परी, ही भूमिका साकारणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेत आहे. तिचं बोलणं, तिच्या चेहऱ्यावर असणारे भाव आणि या साऱ्यामध्ये मनं जिंकणारी तिची निरागसता मालिकेला चार चाँद लावून जात आहे.
भारतात Whats App कडून 30 लाख अकाऊंट बॅन, यात तुमचं अकाऊंट तर नाही?
परी, म्हणजेच मायरा वैकुळ ही चिमुरडी सोशल मीडियावरही बऱ्याचजणांच्या व्हिडीओमध्ये दिसते. किंबहुना तिचा स्वत:चा युट्यूब चॅनलही आहे. मायराचा नुकताच पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेत असून, पाहणाऱ्यांना अरे ही किती क्यूट आहे..... किती गोड आहे असं म्हणायला भाग पाडत आहे.
आपल्या मामेभावासोबत मायरानं केलेली धमाल या व्हिडीओमध्ये दिसत आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये एकदा शहनाज गिल हिनं ‘साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी’ असा डायलॉग मारला होता. ज्यानंतर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला. पुढे यशराज मुखाते या अफलातून कलाकारानं त्याच्या खास टचनं हा व्हिडीओ एका नव्या रुपात सादर केला. पुढे या व्हिडीओचे अनेक वर्जन व्हायरल झाले. प्रत्येकानं या व्हिडीओला आपल्या अंदाजाकत सादर केलं. पण, मायरानं ज्या प्रकारे हा व्हिडीओ गाजवला आहे तसं बहुधा पाहायलाच मिळालं नसावं.