झी चित्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऑस्कर समजला जाणारा मानाचा “झी चित्र गौरव” पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात झाला. हा सोहळा तुम्हाला २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर पाहता येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 10, 2018, 01:07 AM IST
झी चित्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न  title=

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऑस्कर समजला जाणारा मानाचा “झी चित्र गौरव” पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात झाला. हा सोहळा तुम्हाला २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर पाहता येणार आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट मुरंबा

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक “अमित मसुरकर” या वेळी “हंपी आणि कच्चा लिंबू” या चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार मिळविले. सचिन खेडेकर यांना बापजन्म साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर सोनाली कुलकर्णी हिला कच्चा लिंबू साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला मुरंबा.

सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांच खुसखुशीत सूत्रसंचालन, उमेश कामत - स्पृहा जोशी, सिद्धार्थ जाधव - पर्ण पेठे, आदिनाथ कोठारे - प्राजक्ता माळी यांचा डान्स परफॉर्मन्स ने कार्यक्रमात बहार आणली. या वर्षी “जीवन गौरव” पुरस्काराच्या मानकरी ठरल्या गेली अनेक दशके कलाक्षेत्रावर आपला ठसा उमटवणाऱ्या “आशाताई काळे आणि मधू कांबीकर”. तसेच मराठी पाऊल पडते पुढे या पुरस्काराचे मानकरी ठरले. 

पुरस्कार विजेत्यांची नावे



CATEGORY WINNER
   
सर्वोत्कृष्ट वेशभूषा  विक्रम फडणीस डिझाईन टीम - हृद्यांतर
   
सर्वोत्कृष्ट रंगभूषा विद्याधर भट्टे - कच्चा लिंबू
   
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन संतोष फुटाणे - कच्चा लिंबू
   
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर - हंपी Apne Hi Rang me
   
सर्वोत्कृष्ट संकलन जयंत जठार - कच्चा लिंबू
   
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण अमलेंदू चौधरी - हंपी
   
सर्वोत्कृष्ट ध्वनीरेखाटन अभिजीत केंडे - भेटली तू पुन्हा
   
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत नरेंद्र भिडे / आदित्य बेडेकर - हंपी
   
सर्वोत्कृष्ट गीतकार वैभव जोशी - मुरांबा (Title song)
   
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका रुपाली मोघे - मरुगेलारा ओ राघवा (हंपी)
   
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक jasraj joshi- मुरांबा शीर्षक गीत (मुरांबा)
   
सर्वोत्कृष्ट संगीत नरेंद्र भिडे / आदित्य बेडेकर - हंपी
   
सर्वोत्कृष्ट कथा वरुण नार्वेकर - मुरांबा
   
सर्वोत्कृष्ट पटकथा वरुण नार्वेकर - मुरांबा
   
सर्वोत्कृष्ट संवाद मधुगंधा कुलकर्णी - चि. व चि. सौ. का.
   
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विजय निकम - मला काहीच प्रॉब्लेम नाही
   
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ज्योती सुभाष - चि. व चि. सौ. का.
   
सर्वोत्कृष्ट अभिनेता सचिन खेडेकर - बापजन्म
   
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी - कच्चा लिंबू
   
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नचिकेत सामंत - गच्ची
   
सर्वोत्कृष्ट चित्रपट मुरांबा
   
सर्वोत्कृष्ट खलनायक गिरीश कुलकर्णी - फास्टर फेणे
   
परीक्षक पसंती पुरस्कार रिंगण
   
सर्वोत्कृष्ट बालकलाकार साहिल जोशी - रिंगण
   
परीक्षक पसंती पुरस्कार - दिग्दर्शन  मंगेश जोशी - लेथ जोशी