'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीचं निधन

यंदाच्या वर्षी अनेक दिग्गज कलाकारांनी आपले जीव गमावले आहे.    

Updated: Oct 19, 2020, 12:17 PM IST
'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीचं निधन  title=

नवी मुंबई : टीव्ही आणि फिल्म विश्व गाजवलेल्या अभिनेत्री झरीना खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कार्डिऍक अरेस्टमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे संपूर्ण कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीत्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'कुमकुम भाग्य' मालिकेतील त्यांची इंदू दादीची भूमीकेने चाहत्यांच्या मनात घर केले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

...

A post shared by Sriti Jha (@itisriti) on

त्याच्या निधनाच्या बातमीने 'कुमकुम भाग्य' मालिकेच्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री सृती झाने (Sriti Jha) व्हिडिओ आणि एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Ye chand sa Roshan Chehera 

A post shared by Shabir Ahluwalia (@shabirahluwalia) on

दरम्यान, यंदाच्या वर्षी अनेक दिग्गज कलाकारांनी आपले जीव गमावले आहे. त्यामुळे कलाविश्वाला मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. काहींचा मृत्यू कोरोनामुळे तर काहींनी अन्य आजामुळे आपले प्राण गमावले आहेत.