झरीन खानचे आपल्या एक्स मॅनेजरविरुद्ध गंभीर आरोप

सुपरस्टार सलमान खान सोबत बॉलीवुड करियरची सुरूवात करणारी सुंदर अभिनेत्री झरीन खान सध्या चर्चेत आहे.

Updated: Dec 7, 2018, 08:19 AM IST
झरीन खानचे आपल्या एक्स मॅनेजरविरुद्ध गंभीर आरोप  title=

मुंबई : सुपरस्टार सलमान खान सोबत बॉलीवुड करियरची सुरूवात करणारी सुंदर अभिनेत्री झरीन खान सध्या चर्चेत आहे. तिने आपली एक्स मॅनेजर अंजली अथ विरोधात तक्रार दाखल केली आहे. पैशांच्या कारणावरून अंजली अथने झरीनला अपमानकारक बोलल्याचे झरीनचे म्हणणे आहे. त्यामुळे झरीनने आपल्या वकिलासोबत गुरूवारी खार पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी अंतर्गत तक्रार दाखल केली.

Image result for zareen khan zee news

वादग्रस्त मेसेज  

Image result for zareen khan zee news

3 ते 4 महिने झरीन सोबत काम केल्यानंतर दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरू झाला. त्यानंतर दोघींनी एकमेकांना खूप सारे मेसेज देखील केले. हे सुरू असताना मॅनेजर अंजलीने तिला वादग्रस्त Image result for zareen khan zee news

मेसेज केल्याचे झरीनने तक्रारीत म्हटलंय. दरम्यान झरीनने पोलिसांना नेमके काय पुरावे दिले याबद्दल माहिती समोर आली नाही.

आयपीसी कलम 509  अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.