'तुला एवढं सुंदर दिसण्याचा काही अधिकार नाही'

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे.   

Updated: Jul 31, 2019, 05:50 PM IST
'तुला एवढं सुंदर दिसण्याचा काही अधिकार नाही'  title=

मुंबई : आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर तिच्या ३८व्या वयात सुद्धा फार सुंदर दिसते. करिना कपूरने आतापर्यंत अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत चित्रपटामध्ये काम केलं आहे. यामध्ये तिने खान घराण्यातील शाहरुख, सलमान,आमीर आणि सैफ या अभिनेत्यांसोबतही काम केलं आहे. सध्या करिनाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Pink mode on for @zeetvdid Hair by @yiannitsapatori Makeup by @mickeycontractor Styled by @mohitrai Team @priyangis kadamajay

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

एका फोटोशूट दरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या चांगल्याच प्रतिक्रिया येत आहे. या फोटोमध्ये करिनाने एका साधं गळ्यातलं घातले आहे. या फोटोमध्ये ती फार ग्लॅमरस दिसत आहे.

करिना सध्या 'डान्स इंडिया डान्स' शोमध्ये परिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. त्याचप्रमाणे ती लवकरच पहिल्यांदाच अभिनेता इरफान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. करिना कपूर लवकरच ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.