तरुणीने पाठीवर काढलं बाहुूबलीचं चित्र

बाहुबली प्रभास आज एक सुपरस्टार बनला आहे. लोकं प्रभाससाठी वेडे झाले आहेत. अनेक तरुणी प्रभासच्या फॅन्स आहेत ज्या त्याच्यासाठी काहीना काही करत असतात.

Updated: Nov 18, 2017, 09:48 AM IST
तरुणीने पाठीवर काढलं बाहुूबलीचं चित्र title=

मुंबई : बाहुबली प्रभास आज एक सुपरस्टार बनला आहे. लोकं प्रभाससाठी वेडे झाले आहेत. अनेक तरुणी प्रभासच्या फॅन्स आहेत ज्या त्याच्यासाठी काहीना काही करत असतात.

प्रभासला आतापर्यंत 6000 लग्नाचे प्रस्ताव आले आहेत. अनेक फॅन्स वेगवेगळ्या प्रकारे आपल्या स्टारचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काहीना काहीना नवीन करत असतात. अशातच प्रभासच्या एका फॅनने आपल्या पाठीवर प्रभासचा फोटो बनवला आहे.

अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एका स्त्रीने तिच्या पाठीवर बाहुबली प्रभासचं चित्र काढलं आहे. सध्या प्रभास हा 'साहो' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट हैदराबादमध्ये चित्रीत केला जात आहे. श्रद्धा कपूर प्रभातसह या चित्रपटात दिसणार आहे.