महिलेला अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडणाऱ्या कोरिओग्राफरविरोधात तक्रार

कलाविश्वात तो बराच प्रसिद्ध आहे 

Updated: Jan 28, 2020, 10:44 AM IST
महिलेला अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडणाऱ्या कोरिओग्राफरविरोधात तक्रार  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : काम करण्यापासून दूर ठेवत महिलेला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडणाऱ्या नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य याच्याविरोधा तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका ३३ वर्षीय महिला कोरिओग्राफरने त्याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली. त्यामुळे आता गणेश आचार्यच्या अडचणींत वाढ होणार आहे. 

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार संबंधित महिलेने तिची ही तक्रार महिला आयोग आणि अंबोली पोलीस स्थानकात दाखल केली. शुक्रवारीच आचार्यने त्याच्यावर ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी त्याच्यावर लावलेले आरोप फेटाळले. गणेश आचार्य या त्याच्याकडील नृत्यासाठी येणाऱ्या कलाकारांचं शोषण करतो, शिवाय आपल्या पदाचा वापर करत तो सिने ड़ान्सर्स असोसिएशनची प्रतिमाही मलिन करतो असे आरोप त्यांनी केले होते. 

पाहा उणे ४० अंश तापमानात भारतीय सैन्यातील जवान कसं करतात देशाचं रक्षण 

गंभीर मुद्द्यावरील वादात अडकण्याची ही आचार्यची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचे गंभीर आरोप केले असताना तिने गणेश आचार्य यांच्यावरही काही गंभीर आरोप केले होते. त्यावेळीसुद्धा त्याने आपल्यावरील आरोप फेटाळले होते. पण, तो खोटारडा असून एक दुतोंडी माणूस असल्याचं सांगत तनुश्रीने त्याच्यावर आगपाखड केली होती.