'यादें याद आती है', सराफ, पिळगांवकर, कोठारे एकत्र येतात तेव्हा....

जुन्या आठवणींना उजाळा 

Updated: Sep 30, 2019, 02:02 PM IST
'यादें याद आती है', सराफ, पिळगांवकर, कोठारे एकत्र येतात तेव्हा.... title=

मुंबई : मराठी कलाकार सिनेमांमध्ये एकत्र काम करत असले तरीही त्यांच्यात खूप चांगली मैत्री असते. फक्त कामाच्या दृष्टीकोनातून नाही तर ही मंडळी अगदी एकमेकांचे सगेसोयरे असतात. कामाव्यतिरिक्त यांच्यात खास नातं असतं आणि ते म्हणजे 'मैत्री'चं. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय मैत्री म्हटलं की, सगळ्यांना आठवतो तो 80 आणि 90 च्या दशकातील काळ. जेव्हा एका चौकडीने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. ती चौकडी म्हणजे ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेता महेश कोठारे, ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर आणि ज्येष्ठ अभिनेता आणि सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे. 

या चौघांनी मराठी सिनेसृष्टीला खऱ्या अर्थाने वेगळी ओळख निर्माण करून दिली. मराठी प्रेक्षकांच फक्त मनोरंजनच नाही तर त्यांना चांगल्या आठवणींचा खजिना दिला. या चौघांचे कोणतेही सिनेमे इतक्या वर्षांनी पाहिले तरी चेहऱ्यावर हास्य आल्याशिवाय राहणार नाही. 'अशी ही बनवाबनवी' हा माईल स्टोन ठरलेल्या सिनेमाने नुकतेच 31 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजही ही कलाकृती सगळ्यांना निख्खळ आनंद देत आहे. असं असताना अभिनेता महेश कोठारे यांनी या सगळ्या आठवणींना उजाळा देणारा फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 ही दोस्ती तुटायची नाय — @ashok_saraf_ and @sachinpilgaonkar  . . . . . . #BestFriends #Family #MaheshKothare #AshokSaraf #SachinPilgaonkar #MissYouLaxmikant 

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare) on

अभिनेता महेश कोठारे यांनी हा इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ही दोस्ती तुटायची नाय... असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. महत्वाचं म्हणजे हॅशटॅगमध्ये त्यांनी मिस यू लक्ष्मीकांत म्हणतं अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या चार कलाकारांनी मराठी सिनेमाला भरभरून दिलं आहे. 

आदिनाथ कोठारे यांनी देखील इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बाते हैं... #sundayvibes #aboutlastnight अशी कॅप्शन देत या फोटोला खास बनवलं आहे. या फोटोत अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, महेश कोठारे त्यांची पत्नी, आदित्य कोठारे, उर्मिला कोठारे, किरण शांताराम ही मंडळी कोठारे कुटुंबियांच्या घरी उपस्थित होते. या फोटो पाहून सगळ्यांना अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही. चाहत्यांनी देखील ही पोकळी ओळखून कमेंटमध्ये लक्ष्मींकात बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

त्याचप्रमाणे अभिनेत्री उर्मिला कोठारेने देखील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर या दोघी उर्मिलासोबत बसल्या आहे. 2 gorgeous beauties ... म्हणतं हा फोटो शेअर झाला आहे. आपल्याला माहितच आहे निवेदिता सराफ सध्या झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेत आसावरीची भूमिका साकारत आहेत.