करण जोहरच्या सिनेमांची नावे K वरून का असतात? या कारणामुळे आपलं मत बदललं

स्वतः करण जोहरने मान्य केली ही गोष्ट 

Updated: May 25, 2021, 01:06 PM IST
करण जोहरच्या सिनेमांची नावे K वरून का असतात? या कारणामुळे आपलं मत बदललं  title=

मुंबई : करण जोहर बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि प्रोड्युस आहे. करण जोहरने आतापर्यंत अनेक स्टारकिड्सला लाँच केलं आहे. करणने 'कुछ कुछ होता है' सिनेमातून दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली. रोमँटिक सिनेमात शाहरूख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांची मुख्य भूमिका होती. करिअरच्या सुरूवातीला करण जोहर आपल्या सिनेमांची नावे 'K' अक्षरावरून ठेवयाचा. याच कारण काय आहे? 

करण जोहरने दिग्दर्शक म्हणून 1998 मध्ये पदार्पण केलं. प्रेम आणि मैत्रीवर आधारित सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. यानंतर करणने 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो', 'काल' सह अनेक सिनेमांची नावे त्यांनी 'K' वरून आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहरने आपल्या करिअरच्या सुरूवातीला Numerology म्हणजे अंक ज्योतिष शास्त्रावर विश्वास होता. याचमुळे त्यांनी आपल्या सिनेमांची नावे 'K' वरून ठेवली. या अंक ज्योतिषशास्त्राचा कमाल म्हणा किंवा करण जोहर आणि त्याच्या कलाकारांची मेहनत. त्याचे सगळे सिनेमे सुपरहिट ठरले. मात्र एक वेळ अशी देखील आली जेव्हा करण जोहरने असा आंधळा विश्वास ठेवणं बंद केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहरचा अंक ज्योतिष शास्त्रावरचा विश्वास कमी होण्यासाठी कारणीभूत आहे अभिनेता संजय दत्त. 2006 मध्ये संजय दत्तचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा सिनेमा आला होता. यामध्ये ज्योतिष शास्त्रावर भाष्य केलं आहे. यानंतर करण जोहरने आपला विचार बदलला.